HW News Marathi
राजकारण

मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ?

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने गुरुवारी (२१ मार्च) रात्री आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपच्या या यादीतील लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी कि, पक्षाने आगामी निवडणुकांमध्ये भाजपला उभं करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट कापले आहे. अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षांकडून भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात झाली आहे.

जर पंतप्रधान मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ?, असा टोला आता काँग्रेसकडून लागवण्यात आला आहे. “पहिल्यांदा लालकृष्ण अडवाणी यांना जबरदस्तीने मार्गदर्शक मंडळात पाठवले आणि आता त्यांची संसदीय जागा देखील त्यांच्याकडून काढून घेतली. जर पंतप्रधान मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ? भाजप भगाओ, देश बचाओ”, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

लालकृष्ण अडवाणी हे गुजरातच्या गांधीनगरचे विद्यमान खासदार आहेत. अडवाणी हे या मतदारसंघातून अनेकदा निवडून आले आहेत. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये अमित शाह हे मतदारसंघातून लढतील. दरम्यान, अडवाणी यांना तिकीट न देण्यामागे त्यांच्या वयाचे कारण दिले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिकामे हात व उपाशी पोटाचे शाप साध्वीपेक्षा प्रखर आहेत !

News Desk

दिल्ली राज्य मनोज तिवारींच्या बापाचे आहे का ?, केजरीवालांची जीभ घसरली

News Desk

#IrrigationScam : चौकशीला सहकार्य करणार, माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास !

News Desk