HW News Marathi
राजकारण

जर मोदी जन्मतः ओबीसी असते तर संघाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले असते का ?

नवी दिल्ली | “पंतप्रधान मोदी हे मुद्दामहून स्वतःला ओबीसी म्हणवून घेत याचा राजकीय फायदा करून घेत आहेत. नरेंद्र मोदी हे जर जन्मतः ओबीसी असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले असते का ?”, असा बोचरा सवाल उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसप अध्यक्ष मायावती यांनी केला आहे. “पंतप्रधान मोदींकडे आता अन्य काही असल्याने आता त्यांनी महागठबंधन जातीयवादी असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. हे हास्यास्पद आहे”, असेही मायावती म्हणाल्या. मायावती यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

“पंतप्रधान मोदींकडे आता अन्य काही असल्याने आता त्यांनी महागठबंधन जातीयवादी असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. हे अत्यंत हास्यास्पद आहे. जे स्वतः जातीयवादाच्या अभिशापाने पीडित आहेत ते लोकच जातीयवादी कसे काय असू शकतात ? मोदींना जन्मतः ओबीसी असल्याचा दाह सहन करावा लागला नाही. म्हणूनच ते अशी वक्तव्ये करतात”, असेही मायावती यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे मुद्दामहून स्वतःला ओबीसी म्हणवून घेत केवळ याचा राजकीय फायदा करून घेत आहेत, असा आरोपही मायावती यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दिग्गज नेत्यांनी ट्वीट करत केले अभिवादन

News Desk

राम कदम यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाख रुपये | सुबोध सावजी

News Desk

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

Aprna