HW Marathi
देश / विदेश राजकारण

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होऊ शकते | इम्रान खान

इस्लामाबाद | संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वक्तव्य केले आहे. इम्रान खान यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात शांततेने चर्चा होऊ शक्यता असे त्यांनी म्हटले आहे. जर काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणे अशक्य असल्याचे मत इम्रान खान यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटेल आहे.

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या प्रमाणे मोदी देखील एकीकडे भिती आणि राष्ट्रवादाची भावना जागवून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पाकिस्तान आपल्या जमिनीवरील दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवाना शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती.

 

Related posts

झारखंडमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk

वाजपेयींच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली आदरांजली

News Desk

लष्करचा कमांडर बशिराचा खेळ खल्लास !

News Desk