Site icon HW News Marathi

“आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण…” , चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | “आईवडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील, जाऊ दे. आईवरून शिव्या देणे आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा मोदी शाहांना शिव्या देणे सहन करू शकत नाहीत”, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. पुण्यात आयोजित सत्कार समारंभाच्या चंद्रकांत पाटील भाषणात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. पाटलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्याबद्दल किस्सा सांगता वादग्रस्त वक्तव्य केले.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, “हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींच्या रोज उटून शिव्या. रोज उटून मोदींना शिव्या. मी त्यांना म्हटले, आणि ते माझे चांगले मंत्री आहे. मी म्हटले. तुम्ही चूक करताय म्हटले, ते अशा भावनेने होते की, कौन हरा होगा. ते सव्वा लाख मतांनी हरले. मग परवा एकदा केंद्रीय नेत्यांची त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की, दादानी मला सुनावले. ते केंद्रीय नेते 40 वर्षापासून माझ्याशी जोडले असल्यामुळे ते म्हणाले की, दादा कोणानी मला संपवले. दादा मोदी आणि अमित भाईंबद्दल, आईवडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील, जाऊ दे. आईवडिलांवरून शिव्या देणे ही आमच्या कोल्हापूरची पद्धत आहे. मोदी आणि अमित भाईंना शिव्या देणे सहन करू शकत नाही.”

 

अमित शहांच्या सांगण्यावरुन पुण्यात निवडणूक लढविली

चंद्रकांत पाटलांनी 2019 मध्ये पुण्यातील कोथरूडमधून  निवडणुकीसंदर्भात किस्सा सांगताना म्हणाले, “2019 ला मला मिशन दिले गेले. या वयात मला माझी फॅमिली लाईव्ह डिस्टप करायला लागली. अनेकांना असे वाटते की काय मज्जाय बाबा यांची. यांना कोथरुडची जागा मिळाली. यातना माहिती आहेत का? इथून 200 किलो मीटर कोल्हापूर आहे. 16 दिवसांतून एकदा मी घरी जातो. माझ्या घरी माझी आई जी गेली. तिची आई जी 82 वर्षाची आहे. ती आणि मी आमच्या चौगांचा संसार आहे. मला काय निवडून कुठे येता येत नव्हते. कोल्हापूर जिल्ह्यात 4 मतदारसंघ असे होते की जिथे चंद्रकांत पाटील उभे राहतील आणि निवडून येतील. माझा सर्वेवर थोडा विश्वास नाही असा नाही. मग अमित भाई म्हणाले, मुझे थोडा सर्वे करने दो, मग त्यांच्या गृह विभागाने सर्वे केला. मग त्यांचा मला फोन आला. दादा आप बोले वो बराबर है पर फिर भी आप को पुणे जाणा पडेगा. मी कोल्हापूर जिल्ह्यातून जिंकून येवू शकतो हे तुम्ही पहिले मान्य करा. तुम्ही बोलाल तर आम्ही कुठूनही उडी मारण्यास तयार आहोत.

 

 

Exit mobile version