HW News Marathi
राजकारण

जर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल !

मुंबई | “देशाच्या पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. राहुल गांधी जर देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल”, अशी बोचरी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली आहे. ते शिर्डीत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. तुम्हीच सांगा…देशाच्या पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींव्यतिरिक्त दुसरा पर्याय आहे का ?, असा प्रश्न देखील आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभेत उपस्थित लोकांना विचारला.

विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी कोण उमेदवार आहे ?, हा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी झालेल्या युतीच्या प्रचारसभांमध्ये वारंवार विचारला आहे. आता आदित्य यांनी देखील राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. “राहुल गांधी जर देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल, असे आदित्य म्हणाले.

काँग्रेसला कालच (१९ एप्रिल) एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या असलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला राम राम ठोकत थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने कुठेतरी शिवसेनेला देखील नवे बळ आल्याचे म्हटले जात आहे. “मी पक्षातील गैरवर्तनामुळे काँग्रेसमधून बाहेर पडले असून यापुढे शिवसेनेला केवळ राज्य नव्हे तर देश पातळीवर मजबूत करण्याचे काम करेन”, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयात 20 जुलैला एकनाथ शिंदे सरकारचे भविष्य ठरणार

Aprna

“गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी…”, भास्कर जाधवांची शिंदे गटावर टीका

Aprna

महिलांना 33 टक्के आरक्षण मिळायला हवे

News Desk