मुंबई | ‘शिवसेनेने जर महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे वाटत असेल तर तुम्ही सर्वांनी 24 तासात मुंबईत परत या. आणि तुमची मागणी पक्षप्रमुखांसमोर मांडावी,” असा आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर नेता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना दिला आहे. एकनाथ शिंदेंनी आज (23 जून) गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसनमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिदेंनी 42 आमसादारांसोबत शक्तीप्रदर्शन केले आहे. यानंतर मुंबईत राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर शिंदेंच्या गटाला पुढील 24 तासात मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे.
राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडली पाहिजे. आणि वेगळा विचार केला पाहिजे. त्यांनी आधी महाराष्ट्रात यावे, त्यांची जी मागणी आहे. ती मागणी अधिकृत पणे शिवसेना पक्षप्रमुखांसमोर त्यांनी मांडावी. त्यांच्या मागणीचा विचार होईल. पण त्यांनी आधी मुंबईत याची हिम्मत दाखवावी. तिथे बसून तुम्ही पत्र व्यवहार करू नका. आपण पक्के शिवसैनिक आहात. आपण शिवसैनिक असल्याचे सांगत आहात. आम्ही शिवसेना सोडणार नाही असे सांगत आहात. पण आमची भूमिका फक्त सध्याच्या सरकारबद्दल आहे. त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही इथे येण्याची हिम्मत दाखवा. उद्धव साहेबांसमोर या. आणि भूमिका मांडा. नक्की तुमच्या भूमिकेचा विचार होईल. 24 तासात परत या. हे मी परत सांगतोय, मी ही हवेतील ही भूमिका मांडत नाही. 24 तासात तुम्ही परत या. उद्धवसाहेब सोबत आपण बसू आणि तुमची जी भूमिका आहे. ती स्वीकारण्यासंदर्भात नक्की विचार केला जाईल.”