HW News Marathi
राजकारण

शिवसेनेत हिंमत असेल तर मुंबईत ओवेसींना अडवून दाखवावे !

मुंबई | “एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे २५ फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. तेव्हा आमची मुंबई म्हणणा-या शिवसेनेने हिंमत असेल तर ओवेसींना अडवून दाखवावे”, असे थेट आव्हान डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी केले आहे. कोल्हापुरातील वंचित बहुजन आघाडीच्या सभेला असदुद्दीन ओवेसी उपस्थित राहणार होते.

“जर ओवेसींनी कोल्हापूरात सभा घेतली तर ती उधळून लावू”, अशी धमकी त्यावेळी शिवसेनेने दिली होती.”तुमच्यात ओवेसींना रोखण्याची ताकद नाही. ते जरी कोल्हापूरात आले नसले तरी ते मुंबईत येणार आहेत हे निश्चित. शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी ओवेसींना अडवून दाखवावे”, असे आव्हान कांबळे यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेश-मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू

News Desk

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज

swarit

भाजपच्या पराभवासाठी शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात

News Desk