Site icon HW News Marathi

‘मविआ’ला गरज असेल तर आमच्याशी संपर्क करावा” ओवेसींचे सूचक वक्तव्य

मुंबई |  “महाविकासआघाडीला गरज असेल तर आमच्याशी संपर्क साधावा,” असे सूचक वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीला मतदान करण्यासंदर्भात म्हणाले. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा निवडून आणण्यासाठी महाविकासआघाडी आणि भाजप अपक्ष आमदारांशी संपर्क करत आहेत.
ओवेसी म्हणाले, “माझी मुफ्ती इस्माईल आणि फारूख शेख यांच्याशी देखील चर्चा झाली . दुसरी गोष्टी ही आहे की, महाविकासआघाडीकडून कोणी आमच्याशी संपर्क केलेला नाही आणि आमच्या आमदारांशी देखील संपर्क केलेला नाही. आम्ही बघू, जर महाविकासआघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. महाविकासआघाडीला आमची गरज नसेल तरी ठिक आहे.  आम्हाला जो निर्णय घ्याचा आहे तो निर्णय आम्ही घेऊ. परंतु, आतापर्यंत महाविकासआघाडीकडून आमच्यासोबत कोणताही संपर्क केलेला नाही. आम्ही देखील आमच्या आमदारांशी संपर्क साधत आहोत. 10 तारखेला मतदान होणार आहे. यामुळे आम्ही 1-2 दोन दिवसात निर्णय घेणार आहोत.”
महाविकासआघाडी तुमच्याशी संपर्क करून मते मागितली तर तुम्ही काय करणार, या प्रश्न ओवेसी म्हणाले, “तुम्ही महाविकासआघाडीला सांगा की आमला संपर्क करा. मी तुम्हाला उघडपणे सांगतोय की, तुम्ही महाविकासआघाडीला आम्हाला संपर्क करण्यासाठी सांगा, हे मी तुम्हाला उघडपणे सांगत आहे.”
राज्यसभेच्या मतदानसंदर्भात 1-2 दिवसांत विचार करुन मतदान करणार
महाविकासआघाडीने तुमच्याशी संपर्क केला नाही तर तुम्ही मतदान करणार का?, या प्रश्नावर ओवेसी म्हणाले, “आम्ही निर्णय घेऊ आम्ही आज किंवा उद्या निर्णय घेऊ मालेगावचे जे आमचे मुफ्ती इस्माईल आमचे ते विधानसभाचे आमच्या पार्टीचे लिटर आहेत. माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. इस्माईल यांच्यासोबत इम्तियाज जलील यांनी देखील चर्चा केली आहे. काल रात्री उशीरापर्यंत आमची फारुख शेख यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे. आणि आमच्या पार्टीच्या दोन्ही आमदारांच्या क्षेत्रातील विकास कामासंदर्भाच चर्चा झाली. त्यांच्या मतदार संघात विकास कामे बाकी आहेत.”
Exit mobile version