Site icon HW News Marathi

एका बापाचे असाल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा! – संजय राऊत

मुंबई | “तुम्ही एका बापाचे असाल तर आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा,” असे आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर केली आहे. राऊतांनी आज (26 जून) दहिसरच्या शिवसेना मेळाव्यात बंडखोरांचा खरबूस समाचार केला आहे. यावेळी राऊतांनी शिवसेनेचे बंडखोर नेता एकनाथ शिंदेसह त्यांच्या गटात सामील झालेल्या संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, यामिनी जाधव आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र केले आहे.

राऊत म्हणाले, “शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी वाढवलेली ती खरी शिवसेना आहे. तर शिवसेना ही 56 वर्षांची चिरतरुण आहेत. या शिवसेना मरण नाही, ते म्हणाले. राऊत पुढी म्हटले की, शंकराने हलाहल प्राशन करताना जे थेंब सांडले. त्यामधून शिवसेना तयार झाली आहे. याच शिवसेनेची पहिली सत्ताही ठाण्यात मिळवली. आता ठाण्याच्या नेत्यांनी सूड उगवला असून शिंदे म्हणजे ठाणे नाही. ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली.  तो आता संपला असून हिम्मत असेल तर राजीनामा द्या. तुम्ही एका बापाचे असाल तर आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आणि निवडणुकीला समोर उभे राहा. मी तुम्हाला चॅलेंज करतो.”

गुलाबराव पाटील हे तर ढुंगणाला पाय लाऊन पळून गेला. ते तर पान टपरी चालवत होते. आता त्यांना परत पान टपरीवर आपण बससवणा आहोत. हे महाभारतामधील संजयचे वाक्य आहे. आणि माझे शब्ध कधी खोटे ठरत नाही, असे राऊत म्हणाले. राऊत पुढे म्हणाले, सेनेने मोरेश्वर सावेचं तिकटी कापून पाटलांना दिले. तो हॉटेमध्यील फरशीवर बसून खायाचा सेनेमुळे आज तो मंत्री झाले, आज त्यांची पाठीत खंजीर खुसपले. तर संदीपान भुमेर हे साखर कारखान्यावर वॉचमेन होते, त्यांना तर मुंबई माहिती सुद्धा नव्हती.

संबंधित बातम्या
“कब तक छिपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे…,” राऊतांचा बंडखोरांना इशारा

 

Exit mobile version