Site icon HW News Marathi

“…तर राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली”, अजित पवारांची टीका

मुंबई | “महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर दिली आहे. राज्यपालांनी औरंगाबादच्या एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर राज्यभरातून राज्यपालांविरोधात आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट शेअर करत राज्यपालांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपालांना  छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधानांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपालांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना!”

राज्यपाल नेमके काय म्हणाले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपालांनी कार्यक्रमादरम्यान म्हणाले, “तुमचा आदर्श कोण आहे. जेव्हा यापूर्वी विचाले जात होते. तेव्हा ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’, अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, आता महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत.”

 

 

Exit mobile version