HW News Marathi
राजकारण

मुंबईत शिवसेनेला जोरदार झटका शिवसेनेचे वाघ मनसे मध्ये

मुंबई | शिवसेनेचे उपनेते दशरथ शिर्के व घाटकोपर पुर्वचे शिवसैनिक राजेश राणे यांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सरचिटणीस व माथाडी कामगार युनियनच्या अध्यक्षांनी शेकडो माथाडी कामगारांसहीत मनसेत प्रवेश केला. महिन्या भरापूर्वी सेनेच्या वतीन नवीन पदाधिकाऱ्यांच्या नवाची यादी जाहीर केली होती.

त्या यादीत नव्याने पक्ष्यात प्रवेश केलेल्यांना पदे दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही शिवसैनिकांनी बॅनर लावून आपली नाराज व्यक्त केली होती. त्यामुळे जुन्या नाराज शिवसैनिकांनी सेनेला जय महाराष्ट्र केला.

पालिका निवडणुकीत मनसेला अपयश मिळाले होते. यानंतर मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशावरुन चांगलेच राजकारण पेटले होते. गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत राज ठाकरे काय बोलणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने सेने आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. शिवसेना आतापासूनच आगामी निवडणुकीची तयारी करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी माढ्याला वळवा !

News Desk

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, हिंसाचारमुळे उद्यापासून पश्चिम बंगालमधील प्रचारबंदी

News Desk

भविष्यात काहीही होऊ शकते !

News Desk