HW News Marathi
राजकारण

छगन भुजबळ यांना आपले मतदान केंद्रच सापडेना

नाशिक | नाशिकमध्ये आज मोठ्या प्रमाणात मतदान हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी बघायला मिळाली. मात्र देशभर बऱ्याच मतदान केंद्रात झाला तसा नाशकातही मतदान केंद्रावर गोंधळ झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना चक्क त्यांचे मतदान केंद्रच सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये अनेक मतदान केंद्रात यादीत आपले नावच नसल्याने मतदारांचा गोंधळ उडत आहे. अनेकांना मतदान केंद्र शोधण्यासाठी ४ ते ५ तास फिरावे लागत आहे. याचा फटका छगन भुजबळ यांना देखील बसला आहे. भुजबळ यांचे मतदान केंद्र असलेल्या ग्रामोद्य विद्यालयात त्यांना आपल्या मतदान केंद्र असलेल्या १५ ते २० मिनिटे फिरावे लागले. एवढेच नव्हे तर नाशिकमधून राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या आईचे नावही मतदान यादीत नसल्याचे सांगितले जात आहे. सरकारकडून हेतुतः असा त्रास मतदारांना दिला जात असल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे.

नाशकात समीर भुजबळ यांच्या विरोधात महायुतीचे हेमंत गोडसे असा सामना आहे. काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन देखील खराब होत आहेत, अनेक ठिकाणी ४ ते ५ किलोमीटर फिरुनही मतदारांना मतदान केंद्र सापडत नसल्याने मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न का सोडवता येत नाही?”, मनीषा कायंदेंची शिंदे सरकारवर टीका

Darrell Miranda

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलं अर्थसंकल्प सादर होणार; शेतकरी, मध्यमवर्गीयांच्या वाटेला काय येणार?

Aprna

“भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय ‘ते’ वक्तव्य”-नाना पटोले

News Desk