HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशाच्या निवडणुकीत पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात

नवी दिल्ली | भाजप आणि काँग्रेस आपल्या स्टार प्रचारकांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून मत मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या १५ वर्षांपासून मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. तिच कायम ठेवण्यासाठी भाजपाने जेष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांना प्रचारामध्ये उतरवले आहे.

हरदा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कमल पटेल यांच्या प्रचारासाठी हेमा मालिनी मैदानात उतरल्या आहेत. हेमा मालिनी यांनी ‘बसंतीके इज्जत का सवाल है’, त्यांच्या सुप्रिसद्ध चित्रपट शोले या सिनेमामधील डायलॉग बोलून भाजप उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले आहे. १९७५ मध्ये बॉक्सऑफिसवर आलेल्या ‘शोले’ सिनेमामध्ये हेमा मालिनी यांनी बसंतीची भूमिका साकारली होती. टांगा चालवताना सिनेमात त्या हा डॉयलॉग (बसंती की इज्जत का सवाल है) आपल्या घोडी उद्देशून बोलत असतात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरीही मृदंगाचा गजर सुरूच आहे !

News Desk

#ArunJaitley : महाजनादेश यात्रा पुढच्या दोन दिवसांसाठी स्थगित

News Desk

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

Aprna