Site icon HW News Marathi

गुजरात विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये बंडखोरी

मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujarat Assembly Elections) बिगुल वाजले आहे. यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने उमेवारांची यादी देखील जाहीर केली आहे. यानंतर भाजपने आतापर्यंत  उमेदवारांची दोन यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादी 161 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 6 उमेदवारांच्या नावाची यादी शनिवारी (12 नोव्हेंबर) जाहीर केली. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांची नावे नसल्याने पक्षात नाराजीचे सूर आवळून लागले.

भाजपचे एक विद्यमान आमदार त्यांच्यासह 4 माजी आमदारांचे उमेदवारांच्या यादी नसल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. या नाराज आमदारांनी त्यांच्या समर्थकांशी सल्लामसलत करून हे आमदार पुढची दिशा ठरवणार आहेत, अशी माहिती माध्यमातून मिळाली आहे. यापूर्वीच भाजपचे माजी आमदार आणि पक्षाचा आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेले हर्षद वसावा यांनी नांदोड मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमदेवारी अर्ज दाखल केला आहे.

गुजरात भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे हर्षद वसावा हे अध्यक्ष आहेत. यापूर्वी हर्षद वासाव यंनी 2002 ते 2007 आणि पुन्हा 2007 ते 2012 या काळात राजपिपला मतदारसंघातून निवडून विधानसभेवर गेले होते. परंतु, सध्या हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. या मतदारसंघासाठी भाजपने डॉ. दर्शना देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर हर्षद वसावा भाजपच्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर हर्षद वसावा हे शुक्रवारी (11 नोव्हेंबर) नांदोड जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी वसावा म्हणाले, भाजपमध्ये मुळ निष्ठवंत भाजप आणि दुसरे नवीन पक्षात आलेले भाजप कार्यकर्त्यांते अशी लढाई येथे सुरू आहे. मुळ निष्ठावंतांना बाजूला फेकले आणि नवीन लोकांच्या हातात पक्षाची सूत्रे दिलेली आहे. आणि मी माझा राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे. या भागत मी किती काम केले आहे. हे येथील जनतेला माहिती आहे.”

भाजपच्या दुसऱ्या यादीतील सहा वेळाचे आमदार मधू श्रीवास्तव डावलून त्यांच्या जागी अश्विन पटेल यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर वडोदरा जिल्ह्यातील पदरा मतदारसंघातील माजी आमदार दिनेश पटेल यांनी आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. भाजपने दिनेश पटेल यांच्या मतदारसंघात  चैतन्यसिंह झाला यांना तिकीट दिले आहे. तर सध्या ही जागा काँग्रेसकडे आहे. कर्जनमध्ये भाजपने विद्यमान आमदार अक्षय पटेल यांना परत एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने भाजपचे माजी आमदार सतीश पटेल नाराज असल्याचे चर्चा सुरु आहे. तसेच 2017 मध्ये अक्षय पटेल हे काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते. यानंतर अक्षय पटेल हे 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाला.

 

Exit mobile version