Site icon HW News Marathi

अधिवेशनात कांदा, कापूसाची माळा घालून NCP च्या आमदारांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (maharashtra budget session) दुसऱ्य दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांनी कांद्याच्या माळा आंदोनल केले.  राज्यात कांदाला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर शेतकऱ्यांनी लासलगावातील कांदा लिलवा बंड पाडला असून सतत कांद्याच्या भावात घसरण होत असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर  राज्याच्या राष्ट्रवादी निफाडचे आमदार दिलीप बनकर आणि यांच्या तर आमदारांनी कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले.

अधिवेशनात आज विरोधकांनी डोक्यावर कांद्याची टोपली घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.  “कांद्याला भाव मिळालाच पाहिजे…, अरे हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे…, कापसाला भाव मिळालाच पाहिजे…”, अशा घोषणा विरोधाकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर दिल्या. तर शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो, असे  फलक हातात घेऊन सरकार विरोधात घोषणा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गळ्यात लसूण, कापूस आणि कांद्याची माळ घातल्याचे दिसून आले. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर त्यांनाच कांद्यासारखे सोलून काढू, असा थेट इशारा विरोधकांनी दिला आहे.

राज्यातील एकट्या नाशिक जिल्ह्यात 51 हजार हेक्टर जमिनीवर लाल कांद्याची लागवड झाली असून या कांद्याला निम्मा म्हणजे 20 ते 25 हेक्टर क्षेत्रावरील कांदा बाजारात येणे बाकी आहे. लासलगाव जिल्ह्यातील इतर बाजारात समिती लाखो रुपयांची कांद्याची उलाढाल होत असते. देशातील मध्य प्रदेश, बिहार, गुजरातसह अन्य राज्यात कांद्याला मागणी असते. परंतु, यंदा मध्य प्रदेश, बिहार, गुजरातसह अन्य देशातील इतर राज्यात मागणी नाही. लाल कांदा हा लवकर खराब होत असल्याने त्यांनी साठवण ठेवू शकतन नाही.

 

 

Exit mobile version