Site icon HW News Marathi

“…तेव्हा कळेल, वारसाला मिळते की कर्तृत्वाला”, शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबेंना टोला

मुंबई | “येत्या 2 फेब्रुवारीला वारसाला मिळते की कर्तृत्वा”, असे प्रत्युत्तर नाशिक पदवीधर मतदरासंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet tambe) यांना दिले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीमध्ये शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही अपक्ष उमेदवार एकमेंकांवर निशाणा साधत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाकडून एबी फॉर्म देखील आला होता. परंतु, डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तर त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण एकच खळबळ माजली होती.

सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी ट्वीटरवर कव्हर फोटो बदला आहे. “वारसाने संधी मिळते, परंतु, कर्तृत्व हे सिद्ध करावचे लागते! – सत्यजीत तांबे”, असे लिहिले आहे. या विधानावर सत्यजीत तांबे यांनी शुभांगी पाटील यांना बुधवारी (18 जानेवारी) प्रत्युत्तर दिले आहे. ” मी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आझाद मैदानावर उतरले होते आणि माझं कर्तुत्व सर्वांनी बघितल आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 तारखेला वारसाला मिळतं की कर्तुत्वाला मिळतं हे 2 तारखेला जनता दाखवेलच.”

शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी सत्यजीत तांबे यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान सत्यजीत तांबे यांना कपिल पाटील यांनी पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील यांनी कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधला. “कपिल पाटील हे शिक्षक आमदार आहेत, त्यांना हाडाची शिक्षिका दिसली नसावी असे म्हणत काम करणाऱ्यांना संधी न देता त्यांना आणखी दुसरा काही विचार त्यांनी केला असावा”, असा टोला शुभांगी पाटील यांनी लगावला

 

 

Exit mobile version