HW Marathi
देश / विदेश राजकारण

विरोध पक्षांकडून भारतीय सैन्याचा वारंवार अपमान केला जात आहे !

नवी दिल्ली | पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांनी पाकिस्तानची पाठराखण करणारे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांकडून वारंवार भारतीय सैन्याच्या अपमान केला जात असल्याचा आरोप ट्विट करून केला आहे. “विरोध पक्षांकडून वारंवार भारतीय सैन्याचा अपमान केला जात आहे. मी भारतीयांना असे आवाहन करतो कि त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांच्या या वक्तव्यांबाबत प्रश्न विचारावेत. त्यांना सांगा कि, १३० कोटी जनता त्यांच्या या वक्तव्यांबाबत त्यांना कधीही माफ करणार नाही. सर्व भारतीय त्यांच्या सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत”, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.

Related posts

गॅसदरवाढीवरून राज्यसभेत गदारोळ

News Desk

पोलादपूर बस दुर्घटनेवरुन भाजप सरकारवर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk

महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर माझ्याशी गाठ

News Desk