HW News Marathi
राजकारण

‘वर्षा’ निवासस्थानी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानींची भेट; राज्यात चर्चेला उधाण

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. अंबानी आणि मुख्यमंत्री यांच्या काल (24 सप्टेंबर) रात्री १२.१५ वाजता भेट झाली. या दोघांमध्ये एक ते दीड तास चर्चा झाली असून यांच्या भेटीचे मागचे कारण अद्याप कळाले नाही. परंतु, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी भेट घेतली होती, या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. यामुळे अंबानी आणि मुख्यमंत्री यांची भेट ही ठाकरे आणि अदानी यांची भेटच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाते.

गणेशोत्सवाच्या निमितातने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंबानी यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राजकारण तापले होते. मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कारी राज बल्लभ निर्दोष, शिक्षा हा यादवांचा अपमान, राबडी देवींचे अजब वक्तव्य

News Desk

#LokSabhaElections2019 : रमजान महिन्यात येणाऱ्या तारखांना मुस्लिम धर्मगुरूचा आक्षेप, आयोगाचे स्पष्टीकरण

News Desk

पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रमध्ये बदल नक्की घडेल !

News Desk