HW News Marathi
राजकारण

INX Media Case: पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत आणखी चार दिवसांनी वाढ

नवी दिल्ली । आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना आणखी चार दिवस ‘सीबाआय’ कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील सीबीआय न्यायालयाने सोमवारी ( २६ ऑगस्ट) दिला. मात्र, या प्रकरणात ‘ईडी’कडून होणारी संभाव्य अटक टाळण्यासाठी चिदंमबरम यांनी केलेल्या अपीलवर सुनावणी अपूर्ण राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटक न करण्याचा तात्पुरता आदेश मंगळवारपर्यंत वाढविला. तसेच दिल्ली उच्च न्यायालयने रद्द केलेल्या जामीन विरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने मात्र त्यांचे अपील फेटाळून लावलं आहे.

सीबीआयाने तब्बल ३० तासानंतर चिदंबरम यांना बुधवारी (२१ ऑगस्ट) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानात अटक केली. या प्रकरणी गेल्या गुरुवारी (२२ ऑगस्ट) सीबीआय न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. ती मुदत संपल्यावर सीबीआयने सोमवारी पुन्हा चिदंबरम यांना न्यायालयापुढे हजर करून आणखी पाच दिवसांच्या कोठडीसाठी अर्ज केला. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कुहार यांनी आणखी चार दिवसांच्या कोठडीचा आदेश दिले आहेत.

तपासातून मिळालेल्या नव्या माहितीच्या अनुषंगाने चिदंबरम यांची चौकशी करायची आहे. शिवाय इतर आरोपींना समोर बसवूनही त्यांची चौकशी अपूर्ण आहे, अशी कारणे आणखी कोठडी मागताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली. मिळालेल्या पाच दिवसांत अगदीच जुजबी चौकशी करण्यात आली आहे. आताजी चौकशी बाकी आहे, त्यासाठी कोठडी वाढविण्याची गरज नाही, असा प्रतिवाद चिदंबरम यांच्या वतीने कपिल सिब्बल व डॉ. अभिषेक मनु सिंघवी या ज्येष्ठ वकिलांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“औरंगजेब तुमचा कोण लागतो, की तुम्ही ‘त्या’ निर्णयाला स्थगिती देताय?,” राऊतांचा शिंदे सरकारला सवाल

Aprna

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात ‘या’ दिगज्जांनी बजावला मतदानाचा हक्क

Gauri Tilekar

“सावरकरांबद्दल बोलायची राहुल गांधींची लायकी तरी आहे का?”, राज ठाकरेंची राहुल गांधींवर टीका

Aprna