HW News Marathi
राजकारण

देशाची न्यायव्यवस्था धोक्यात, २० वर्षे मुख्य न्यायाधीश म्हणून केलेल्या सेवेचे हे बक्षिस आहे का ?

नवी दिल्ली | “आपल्या देशाची न्यायव्यवस्था धोक्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यापर्यंत काही महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळेच माझ्यावर हेतुपूर्वक हे आरोप लावण्यात आले आहेत,” असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. रंजन गोगोई यांच्याविरुद्ध एका महिलेने लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. रंजन गोगोई यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिलेने सर्वोच्च न्यायालयाच्या २२ न्यायाधीशांना पत्र लिहून रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आरोपामुळे देशात एकच चांगलीच खळबळ माजली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. “मी २० वर्षे मुख्य न्यायाधीश म्हणून केलेल्या सेवेचे हे बक्षिस आहे का ? २० वर्षानंतर आजही माझ्या खात्यात केवळ ६ लाख ८० हजार रुपये आहेत. माझ्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याकडेही माझ्यापेक्षा जास्त पैसे आहेत. त्यामुळे कोणीही माझ्यावर आर्थिक आरोप करुन मला अडचणीत आणू शकत नाही. म्हणूनच ते माझ्यावर असले आरोप करत आहेत”, असे गोगोई यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पंतप्रधान मोदी नीच” या आपल्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर ठाम

News Desk

राफेल करारासाठी रिलायन्सची निवड आम्हीच केली होती !

Gauri Tilekar

आता धनगर आरक्षणावरून सरकारची कोंडी ?

News Desk