Site icon HW News Marathi

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई | शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या माहिती मिळाली आहे. सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात सामील झाल्यास त्यांना मोठा झटका मानला जात आहे. यामुळे आता सुषमा अंधारे पुर्वीप्रमाणेच शिंदे गटावर टीका करणार की मवाळ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

नुकत्या सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंना उपनेत्याची पद दिले. आणि अल्पावधीतच सुषमा अंधारेंना लोकप्रिय झाल्या आहेत. आता सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक आहे. सुषमा अंधारेंचे विभक्त पती शिंदे गटात जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. जर सुषमा अंधारेंचे विभक्त पती शिंदे गटात गेल्यानंतर त्यासाठी त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

शिंदे गटात शनिवारी (12 नोव्हेंबर) ठाकरे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रवेश केल्या. यानंतर आता सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यासोबत अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु, सय्यद यांच्या शिंदे गटात सामील प्रवेश लांबणीवर गेल्याची माहिती माध्यमातून मिळली आहे.

 

 

Exit mobile version