Site icon HW News Marathi

“लोकप्रतिनिधींवर विनयभंगाचा गुन्हा लावणे ‘हा’ अतिशय भ्याड हल्ला”, अजित पवारांची संतापजनक प्रतिक्रिया

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (14 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. “लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे,” अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

 

अजित पवार म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे, अशा शब्दात अजित पवारांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत त्याला बगल देण्याचे काम होते हे महाराष्ट्राला मारक आहे,” असे अजित पवार म्हणाले.

 

लोकप्रतिनिधी बदनाम करण्याचा प्रयत्न
पुढे अजित पवार म्हणाले की, “सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहाता जर कोणी कायदा हाती घेतला, चूक केली, नियमाप्रमाणे वागले नाही तर जरूर कारवाई करावी. मात्र कारण नसताना नवीन कायदे नियमाचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे, जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम कोणी करत असेल याकडे जनतेने जागरुकतेने पाहावे, असे आवाहन अजित पवारांनी केले. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याचीआग्रही मागणी अजित पवारांनी राज्य सरकारकडे केली.”
संबंधित बातम्या

“…ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील,” ऋता आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

“मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय”, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

 

Exit mobile version