Site icon HW News Marathi

सरकारविरोधात बोलल्यामुळे पद्मश्री राहीबाई पोपेरेंचा भर कार्यक्रमात माईक केला बंद

मुंबई | बीज माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांचे भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये भाषण करताना माईक बंद केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राहीबाई पोपरेंनी भाषणामध्ये गावातील अनेक व्यथा मांडल्या. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या भेटीनंतरही गावातील समस्या दुर झाल्या नसल्याचे राहीबाई पोपेरे सांगत, त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. यानंतर राहीबाई पोपेरेंना भाषण थांबवित त्यांचा माईक बंद करण्यात आल्याची घडना घडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राहीबाई पोपेरे म्हणाल्या, “मी देशी गाय, म्हशी, शेळ्या, कोंबड्या, कुत्रे आणि मांजर पाळल्या आहेत. मला सर्व प्रकारचे प्राणी पाळायला आवडतात. ऐवढ्या दुर्गम भागामध्ये अजून त्या गावाला रस्तापण नाही. उन्हाळ्याचे पाणी सुद्धा प्यायला नाहीये. पण, आता खूप लोक येतात, माझ्या घराच्या उद्घाटनाला चंद्रकांत पाटील येणार होते. मी त्यांना म्हणाले, आमच्या खेड्यातील महिलांनी वरून जाताना विमान बघतात. तुम्हाला येईचे असेल तर इथेच हेलिकॉप्टर उतरवा. तरच उद्घाटनाला या. नाही तर येऊ नका. त्यांनी तिथे हेलिकॉप्टर उतरविले, यानंतर ते तिथे उद्घाटनाला आले, आणि त्या दिवसापासून चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतरही गावात कुठलाही फरक पडला नाही”, असे त्या भाषण करत असताना भाजपच्या माजी नगरसेविका कल्पना पांडे या राहीबाई पोपेरे यांच्याजवळ आल्या आणि त्यांचा माईक बंद केला आणि त्यांना भाषण संपवायला सांगितले.

यानंतर राहीबाई पोपेरे यांना भाषण थांबविण्यास का? भाग पाडले, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात येत आहे. नागपूरमध्ये भारतीय विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात राहीबाई पोपेरे भाषण करताना त्यांचा माईक बंद केल्याचा प्रकार घडल्यचा आरोप काँग्रेसकडून केला आहे. या प्रकरणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

 

Exit mobile version