Site icon HW News Marathi

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे सरकार येऊन 1 महिना उलटून गेला. परंतु, राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला नाही. यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर वेळोवेळी हल्लाबोल केला. अखेर राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला राज्यातील मुर्हूत लागला आहे. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या (9 ऑगस्ट)  १० ते १५ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या मंत्र्यांचा शपथ विधीमंडळात हा उद्या राजयभवनात छोट्या खानी होण्याची शक्यता वर्तवली जाते.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (7 ऑगस्ट) दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्ली दौऱ्यादरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तारला ग्रीन सिग्नल मिळाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विधिमंडळ सचिवांनी अधिकाऱ्यांची आज सकाळी एक तातडीची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारवर चर्चा झाली आहे. आणि मंत्रिमंडलाचा विस्तार झाल्यानंतर  हे 10 ते 17 ऑगस्टदरम्यान पावसाळी अधिवेशन होण्याची होणार असल्याचे देखील  संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराची चाहूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल –  फडणवीस

“राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल,” असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी काल दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला आहे. “सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्तार (Expansion of Cabinet) करू नका. असे कुठेही म्हटले नाही,” असेही ते म्हटले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कालच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, विस्तार लवकरच होईल. मी त्या पलिकडे जाऊनही तुम्हाला सांगतो. तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही लवकर होईल.” सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराला विलंब होत आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर फडणवीस पुढे म्हणाले, “मला असे वाटते की, सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका. असे कुठेही म्हटले नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराता काही संबंध नाही. म्हणूनच मी सांगितले की, आम्ही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत. आणि तुम्ही लोक विचार करताय, त्याच्या आधीही आम्ही करू.”

संबंधित बातम्या

“राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल,” फडणवीसांचा पुन्हा एकदा दावा
Exit mobile version