HW News Marathi
राजकारण

ही योग्य वेळ नाही म्हणत लेखिका गीता मेहतांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये प्रसिद्ध लेखिका गीता मेहता यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. परंतु गीता मेहता यांनी पद्मश्री पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे गीता मेहता यांनी हा पुरस्कार नाकारल्याची माहिती मिळत आहे. ही पुरस्कार स्विकारण्याची योग्य वेळ नाही, असे गीता मेहता यांनी म्हटले आहे.

गेल्या ४० वर्षांतील गीता यांचे शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. गीता मेहता या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या मोठ्या बहिण आहेत.

“भारत सरकारने मला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे, त्यांनी मला त्या पात्रतेचे मानले याचा मला अत्यंत आनंद आहे. पण, मी हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही. आगामी लोकसभा निवडणूक काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशावेळी मी हा पुरस्कार स्वीकारला तर माझ्याबाबद्दल समाजात चुकीचा समज निर्माण होऊ शकतो. जे वैयक्तिकरित्या माझ्यासाठी त्याचप्रमाणे सरकारसाठी अपमानास्पद ठरेल. ते मला आवडणार नाही, असे मेहता यावेळी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही लोकांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम करतो !

News Desk

लोकसभा निवडणुकीसाठी युपीमध्ये भाजप सज्ज

News Desk

काँग्रेस आता तीच चूक महाराष्ट्रात करायला जात आहे !

News Desk