Site icon HW News Marathi

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी! – शरद पवार

मुंबई | “अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमदेवार आणि दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगर पालिकेने नामंजूर केला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशानंतर शेवटच्या दिवशी महानगरपालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केल्याचे पत्र दिले. आणि ऋतुजा लटकेंना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी दबाव दिला गेला, आदी मुद्यांवर राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. शरद पवारांनी आज (16 ऑक्टोबर) पत्रकार परिषदे घेत ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे म्हणाले.

 

शरद पवार म्हणाले, “दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातून कोणी उमेदवार उभा राहत असेल. तर आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करणार नाही, व तसा निर्णय ही घेतला. मला प्रामाणिकपणे असे वाटते की, स्वर्गीय रमेश लटके यांचे मुंबई महानगर पालिका व महाराष्ट्राच्या विधमंडळासाठीचे योगदान व या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराचा कालावधी पाहाता. ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. व महाराष्ट्रामध्ये योग्य संदेश जाईल. यासाठी निवडणुकीत कोणतीही प्रतिष्ठा न करता. महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे, असे सर्व संबंधिततांना मी आवाहन करतोय.”

 

मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर केला नाही. आणि हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले.यामुळे तुमच्या आवाहानला प्रतिसाद मिळेल, असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्नवर म्हणाले, “माझ्या मनाला जे योग्य वाटते, त्यामुळे मी आवाहन करत आहे. आणि एखादा निर्णय मी घेतो, त्यामागे काही विचार असतो.”

 

प्रत्येक पक्षाला भूमिका घेण्याचा अधिकार

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी देखील पत्र लिहून भाजपने ही निवडणूक लढवू नये, असे आवाहन केले आहे, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घेण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी ही भूमिका घेतली, यावर तक्रार करण्याचे काही कारण नाही.”

 

 

 

Exit mobile version