HW News Marathi
राजकारण

आणीबाणीवरुन जेटलींनी साधला माजी पंतप्रधानांवर निशाणा

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीला सध्या ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणी दरम्यान माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधने लादली आली होती. याशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. यावरुन आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलरशी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.

जेटलींनी आणीबाणीच्या निमित्ताने फेसबुक पोस्टमधून इंदिरा गांधींवर निशाणा साधला आहे. हिटलर आणि इंदिरा गांधी या दोघांनीही घटनेच्या चिंधड्या उडवल्या होत्या, असेही जेटली या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. त्या दोघांनीही लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या घटनेचे रुपांतर हुकूमशाहीच्या घटनेत केले. हिटलरने संसदेतील बहुसंख्य विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबले होते. आपले अल्पमतात गेलेले सरकार हिटलरने आणीबाणीचा आधार घेऊन दोन तृतीयांश मतांनी वाचवले होते,’ असेही जेटलींनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

अप्रत्यक्षपणे अरुण जेटलींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कृती हिटलरसारखीच होती असे म्हटले आहे. ‘इंदिरा गांधींनीदेखील विरोधी पक्षातील बहुसंख्य नेत्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांनी या नेत्यांच्या अनुपस्थितीत संसदेत दोन तृतीयांश बहुमत सिद्ध केले आणि घटनेत अनेक बदल केले. यामुळे उच्च न्यायालयाचा पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला,’ असेही जेटली फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

Aprna

विनोद तावडेंना तिकीट मिळू नये हा नियतीचा अजब खेळ !

Gauri Tilekar

गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची हजेरी; तर मुंडे बहिणींची दांडी

Aprna