Site icon HW News Marathi

‘साद घातली तर येऊ देत…,’ शर्मिला ठाकरेचे सूचक विधान

मुंबई | एकनाथ शिंदे पक्षासोबत बंडखोरी करत भाजपशी हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी ठाकरे बंधू एकत्र येणार का?, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांना केला होता. यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ‘साद घातली तर येऊ देत…मग बघू,’ असे सूचक विधान केले आहे. यानंतर राज्यात पुन्हा एकाद ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. शर्मिला ठाकरे आज (21 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत.

ठाकरे बंधू एकत्र येतील का? पत्रकारांच्या प्रश्नावर शर्मिला ठाकरे म्हणाले, “तुम्हाला काय वाटते?, असा उलट प्रश्न पत्रकारांना केला. पुढे शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “आपल्या वाटण्यावर काही नसते. ते राजसाहेबच ठरवतील.”  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव टाकरे हे सध्या एकडे पडले आहेत.

“कोणताच पक्ष संपत नसतो. खालच्या पदाधिकाऱ्यांची अजूनही बाळासाहेब यांच्यावर निष्ठा आहे. कोणती खरी शिवसेना ते सर्वोच्च न्यायालयात ठरवेन. केवळ भेटी देऊन उपयोग नाही, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे. आमच्या कडे कोणतीही समस्या आली तर राजसाहेब देवेंद्रजींकडे जातात, स्वतः सगळ्यांना सांगतात. समोरच्याने ऐकल तर चांगले रीझल्ट येतील.” असे ते म्हणाले.

 

Exit mobile version