HW News Marathi
राजकारण

मी अपक्ष लढणार नाही, कालिदास कोलंबकरांचे पक्षबदलाचे संकेत

धनंजय दळवी | “शिवसेना-भाजपसारख्या इतक्या मोठ्या पक्षांना आजमावण्याचा प्रयत्न मी कधीही करणार नाही. मी अपक्ष लढणार असल्याची फक्त हवा केली जात आहे. माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व राजकारण सुरु आहे. मी गेली ४० वर्षे याचा सामना करत आलेलो आहे. त्यामुळे मला याची चिंता नाही”, असे म्हणत काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी एच.डब्ल्यू.शी बोलताना अपक्ष लढण्याचा चर्चांना पूर्णविराम दिला आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अजून काही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कालिदास कोळंबकर हे त्यांपैकीच एक आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून वडाळा मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदार कालिदास कोळंबकर यांचे नाव पक्षबदलाच्या चर्चेत पुढे असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अजूनही कोळंबकर यांचा भाजप पक्षप्रवेश झालेला नाही. दरम्यान, कालिदास कोळंबकर हे अपक्ष लढतील अशीही मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नसून आपण अपक्ष लढणार नसल्याचे कालिदास कोळंबकर यांनी एच.डब्ल्यू,शी बोलताना स्पष्ट केले आहे.

देशातील लोकसभा निवडणुकांच्या काही दिवसांपूर्वी कोळंबकर यांच्या टिळक भवनासमोरील कार्यालयाचे रूप पालटले होते. त्यांच्या कार्यालयावरील होर्डिंगवर त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतचा फोटो दिसून आला होता. तेव्हापासून कालिदास कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र,अद्याप त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही. दरम्यान, “राजकारणात अस्तित्व टिकण्यासाठी पक्ष हा महत्वाचा असतो. तेव्हा पक्षप्रवेश हा होणारच”, अशीही प्रतिक्रिया कालिदास कोळंबकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न

Aprna

शिशीर शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश

News Desk

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या चार जागा सोडण्याचा रिपाइंचा भाजपला प्रस्ताव

Gauri Tilekar