Site icon HW News Marathi

“महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डिवचले

मुंबई | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादसंदर्भात (Maharashtra-Karnataka Border Dispute) पुन्हा कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मोठे विधान केले आहे. कर्नाटकमध्ये हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये सुरू आहे. या अधिवेशनात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला कर्नाटकची इंचभरही जमीन देणार नाही, असे विधान त्यांनी केले आहे. बोम्मईंच्या विधानाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. बोम्मईंनी मंगळवारी (20 डिसेंबर) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवरील चर्चेदरम्यान कर्नाटकच्या विधीमंडळातील दोन्ही सभागृहात एकमताने ठराव पास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, “केंद्र सरकारने दोन्ही राज्यातील वाद सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावू शकतात.  आणि सीमावादावर सल्लाही देऊ शकतात. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील तेच केले. या बैठकीत दोन्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाच्या सूचना शाहांनी दिल्या होत्या. यानंतर आम्हीही शाहांनी दिलेल्या सूचनाचे पालन करण्यात येणार असल्याचे म्हटले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला कर्नाटकची इंचभरही जमीन देणार नाही. अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवावा, अशी सूचना अमित शाह यांनी १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत बोललत होते. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांकडून तीन-तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवाव्यात, असे शाहांनी निर्देश दिले होते.

 

Exit mobile version