HW Marathi
देश / विदेश राजकारण

Karnataka Crisis : विधानसभेत आमदारांनी घालविली रात्र, तर आज ठरणार कुमारस्वामींचे भवितव्य

बंगळुरु | कर्नाटकातील हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच असून गुरुवारी (१८ जुलै) मुख्यमंत्री कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला. मात्र, यावरून विधानसभेत गोंधळ निर्माण झाल्याने  अध्यक्ष रमेश कुमार यांनी आज (१९ जुलै) कामकाज तहकूब केले. गुरुवारी काँग्रसे-जेडीएसचे १५ बंडखोर आणि काँग्रेसचे अन्य दोन आमदार अनुपस्थित होते. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा आणि अन्य भाजप आमदारांनी रात्रभर विधानसभा सभागृह सोडले नाही. विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याची मागणी करत भाजप आमदारांनी विधानसभेत रात्रभर धरणे धरले आणि सर्व आमदार सभागृहातच झोपले.

भाजपच्या काही आमदारांनी उशी आणि बेडसीट आणत विधानसभेतच झोपण्याचा निर्णय घेतला. तर अन्य आमदारांनी सोफा, चादर पाहून झोपत विधानसभेतच रात्र घालविली. काही आमदार सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग वॉकही करताना सुद्धा दिसत होते. आज दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे निर्देश राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना दिले आहेत. त्यामुळे विश्‍वासदर्शक ठरावावर शुक्रवारी मतदान घ्यावे लागेल. परिणामी कुमारस्वामी यांचे सरकार जाणार की राहणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

Related posts

कर्नाटकातील हाईवोल्टेज ड्रामा : आमदारांमुळे पवईत मुंबई पोलिसांकडून संचार बंदी लागू

News Desk

गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती नाही

rasika shinde

MarathaReservation : २५ जानेवारीला मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी होणार

News Desk