HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

येडियुरप्पा २४ तासांचे मुख्यमंत्री?

बंगळुरु | नायक चित्रपटात अनिल कपूर २४ तासाचा मुख्यमंत्री झाल्याचे अनेकांनी पाहिले. नायक चित्रपटानंतर सत्यात देखील या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसून येत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे मोठा पक्ष म्हणून जास्त आमदार असलेल्या भाजप पक्षाला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिले त्यानुसार गुरुवारी भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु त्यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत कॉंग्रेसने हरकत घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

कोर्टात सुनावणी झाल्यानंतर भाजप स्पष्ट बहुमत सिद्ध करु शकले नाही तर येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिल्मी स्टाइल मध्ये रंगलेल्या या राजकारणाचा शेवटी येडियुरप्पांच्या २४ तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या उपभोगाने होण्याची चिन्हे आहेत.

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा गुरुवारी येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहिले नसल्यामुळे खरंच येत्याकाळात मुख्यमंत्री भाजपाचा असणार का याबाबत संभ्रम आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला १५ दिवसांचा अवधी दिला आहे. मात्र प्रथमच अतिशय घाईने निर्णय घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही कोर्टात धाव घेतली. त्यामुळे राज्यपालांनी घेतलेला निर्णय येडियुरप्पांच्या पथ्यावर पडणार की न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्नधान्य उत्पादनात दुपटीने वाढ

News Desk

शरद पवारांनी मोदींच्या विरुद्ध नाही तर श्रीरामांच्या विरोधात विधान केले – उमा भारती

News Desk

‘येस बँके’वर आरबीआयचे निर्बंध, ग्राहकांना आता फक्त ५० हजार येणार काढता

swarit