Site icon HW News Marathi

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खरगे विरूद्ध थरूर; उद्या होणार मतदान

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष (Congress President Election) पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी सोमवारी (17 ऑक्टोबर) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध काँग्रेसचे लोकसभेचे खासदार शशी थरूर सामना रंगणार आहे. या निवडणुकीचा निकाल बुधवारी (19 ऑक्टोबर) येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष पदा कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष पदाचा निवडणुकीचे उमेदवार शशी थरूर यांनी ६ ऑक्टोबर रोजी केरळमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.थरूर यांच्या जाहीरनाम्यात, ‘2024 लोकसभा निवडणुकीत भाजपला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसने पक्षाच पुनरुज्जीवन केले पाहिजे’, असे म्हटले. “पक्षाचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे, कार्यकर्त्यांना सशक्त केले पाहिजे. आणि लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे. मला विश्वास आहे की, यामुळे काँग्रेसला मदतच होईल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत”, असेही थरूर यांनी स्पष्ट केले.

मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दल आदर

थरूर जाहीरनामा प्रसिद्ध करताना बोलताना ते म्हणाले, “माल्लिकर्जून खरगे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून मला त्यांच्याबद्दल आदर आहे. ही निवडणूक भाजपशी लढण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने आधारित मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे. तिचा विचारधारेशी काहीही संबंध नाही. कारण दोघेही सारखेच आहोत. आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची आपल्याला गरज आहे. आपल्याला तरुणांना पक्षात सामावून घेऊन त्यांना खरी ताकद देण्याची गरज आहे. त्याच बरोबर कष्टाळू आणि जुन्या कार्यकर्त्यांना अधिक सन्मान देण्याची गरज आहे.” असे ते म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक नाव चर्चेत 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ही नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या स्पर्धेत होते. पण, अखेर गेहलोत यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. राजस्थानमधील राजकीय परिस्थिती पहाता, निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सुद्धा काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. दिग्विजय सिंह यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर म्हणाले, “निवडणूक लढण्याऐवजी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंबा देत असून त्यांच्या विरोधात लढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आणि पुढेही पक्षासाठी काम करत राहणार आहे.” असे त्यांनी सांगितले होते.

 

Exit mobile version