Site icon HW News Marathi

सेना-भाजप युती, नाणार प्रकल्प प्रश्नांपासून किरीट सोमय्यांचा पळ

मुंबई | अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हावरे प्रोपर्टीज यांच्या वतीने इंटेलिजेंशिया या नवीन प्रॉजेक्टचे भूमिपूजन खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना आणि भाजप युती आणि नाणार प्रकल्प या संदर्भात प्रश्न विचारले असता, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उत्तराची टाळाटाळ करत माध्यम प्रतिनिधींपासून पळ काढला.

हा कार्यक्रम विक्रोळी पूर्व येथील टागोर नगरमधील बिल्डिंग नंबर १८ येथे आयोजित केला होता. यावेळी गेल्या काही दिवसापासून गाजत असलेला कोकणातला नाणार प्रकल्प होणार का ? आणि शिवसेना-भाजपची युती आगामी निवडणुकी आधी होणार का ? या प्रश्नावरुन राजकीय वातावरण तापले आहे. नाणार प्रकल्प हा कोकणात होऊ नये म्हणून स्थानिक रहिवाशी राजकीय नेते मंडळींच्या भेटी गाठी घेत आहेत. त्यामुळे सर्व राजकीय मंडळींचा यांचा या प्रकल्पाला विरोध होत आहे.

तर दुस-या बाजूला २०१९च्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘आम्ही कोणालाही घाबरत नाही, वाघ आणि सिंह दोघेही एकत्र आहोत’ असे अर्थमंत्री सुधीर मुंनगटीवार यांनी विधिमंडळात विरोधकांना उद्देशन सेना-भाजपची युती होणार असल्याचे संकेत दिले होते. मुंनगटीवार यांनी युतीवर चर्चा व्हावी म्हणून बैठकीचे आयोजन केले होते. पण, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीला येणास नकार दिला. या पुन्हा एकदा युतीवर प्रश्न चिन्हा उभे राहिले आहे.

हावरे प्रॉपर्टीज यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार किरीट सोमय्या, शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, डॉ. सुरेश हावरे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक), अमित सुरेश हावरे (मुख्य कार्यकारी अधिकारी व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक) व अमर सुरेश हावरे (कार्यकारी संचालक व सीएफओ) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

Exit mobile version