HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“पेडणेकरांचं स्पष्टीकरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा…”, किरीट सोमय्यांचं नवं ट्वीट

मुंबई : नेहमीच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता कथित SRA घोटाळा उघड करत खळबळ उडवून दिली आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर कथित SRA अर्थात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील घोटाळ्यावरून गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. नुकतंच त्यांनी नवं ट्वीट करत पेडणेकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचं खंडन केलं आहे.

किरीट सोमय्या यांनी आज (शनिवार, 29 ऑक्टोबर) सकाळी एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये सोमय्यांनी म्हंटलं की, पेडणेकरांना आज पुन्हा दादर पोलीस स्टेशनमध्ये यावे लागणार. दादर पोलिस स्टेशनमध्ये १२ एसआरए फ्लॅट्सच्या विक्री प्रकरणी चौकशी सुरु आहे. किश कार्पोरेट कंपनी विरुद्ध मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये देखील चौकशी सुरु आहे. किश कार्पोरेट या कंपनीला कोविडमध्ये बीएमसीचं कंत्राट मिळालं होतं. यासंदर्भात माझी उच्च न्यायालयात याचिका असल्याचं सोमय्यांनी म्हंटलं होतं. मात्र यानंतर किशोरी पेडणेकरांनी सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले होते. इतकंच नाही तर मी चौकशीला जाणार नाही, असंही पेडणेकरांनी स्पष्ट केलं. तसंच दबावतंत्राचा वापर करून आपल्याला अडकवलं जात असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, किशोरी पेडणेकरांनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळल्यानंतर सोमय्यांनी पुन्हा एक ट्वीट केलं असून 2017 मध्ये महापालिका निवडणूक नामांकन पत्रात त्यांचं रहिवाशी ठिकाण वरळी गोमाता जनात एसआरएच्या सहाव्या मजल्याच्या सदनिकेचा पत्ता दिला होता, हा त्यांचा दावा खरा असल्याचे दाखवत कागदपत्राचा फोटो देखील सोमय्यांनी ट्वीटमध्ये जोडला आहे. यामुळे किशोरी पेडणेकरांच्या अडचणी आणखी वाढणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पोलिसांसमोर हजेरी, अलिबागमध्ये बंदोबस्त वाढवला!

News Desk

सचिन वाझे अनिल देशमुखांना एकदाच भेटले, देशमुखांच्या वकिलांचा दावा

News Desk

राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात, १ जूनला होणार बैठक

News Desk