HW News Marathi
राजकारण

शिंदे सरकारमध्ये शपथ घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा संक्षिप्त परिचय

मुंबई | शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचा आज मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. शिंदे गटातील 9 आणि भाजपचे 9 एकूण 18 आमदारांनी मंत्री आज (9 ऑगस्ट) शपथ घेतली आहे.  शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज (9 ऑगस्ट) मुंबईतील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधीची सोहळा पार पडला. शिंदे सरकारमध्ये भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा संक्षिप्त परिचय करू घेऊ या.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा जन्म 15 जून, 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे झाला. पाटील यांचे शिक्षण बी.एस्सी.(ॲग्री) मध्ये पदवी घेतली असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत आहे. पाटील यांचे पत्नीचे नाव शालिनी राधाकृष्ण विखे पाटील आहे. पाटील यांना तीन अपत्ये असून पाटलांना एक मुलगा व दोन मुली आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय कारकर्दी

1987-95 अध्यक्ष, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखाना, लि., प्रवरानगर; संस्थापक-चेअरमन, प्रवरा फळे-भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्था, मर्या.प्रवरानगर, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर; 1995-2000 चेअरमन, दि.मुळा प्रवरा इले.को.ऑप.सोसायटी, लि., श्रीरामपूर; जून, 2002 ते ऑगस्ट, 2003 व्हाईस चेअरमन, सप्टेंबर, 2005 ते डिसेंबर, 2007 चेअरमन, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; या काळात या बँकेद्वारे शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज दराने कृषी कर्ज योजना राज्यात प्रथम सुरु केली; 2006 पासून संचालक, प्रवरा सहकारी बँक लि.लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर; संचालक, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर; सदस्य, कार्यकारी परिषद, पुणे विद्यापीठ; कार्यकारी अध्यक्ष, पद्मश्री डॉ. विखे पाटील फाऊंडेशन, विळदघाट, अहमदनगर; विश्वस्त, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी ; प्रवरा ग्रामीण नैसर्गिक, सामाजिक,
अध्ययन संस्था, प्रवरानगर, प्रवरा रुरल मेडिकल ट्रस्ट, लोणी बु; दि.6 ते 10 नोव्हेंबर, 1998 मुंबई येथे “ॲग्रो ॲडव्हॉन्टेज”चे शासनाच्या वतीने आयोजन करुन राज्यातील सुमारे 5 लाख शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रदर्शन भरवून आधुनिक शेतीबाबतची माहिती दिली; 8 फेब्रुवारी, 2008 भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते थोर अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या
स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकीटाचे विमोचन व अर्ध पुतळ्याचे अनावरण करुन प्रवरानगरमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले; 19 जून, 2008 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या “जनजागरण विकास यात्रा”, कार्यक्रमाचा शुभारंभ शिर्डी विधानसभा मतदारसंघापासून सुरु केला; एस.एस.सी.परीक्षेत दोन विषयात नापास विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी योजना लागू केली.

राज्यातील कायम विनाअनुदानित माध्यमिक शाळा मधील “कायम” शब्द वगळून सर्व शाळांना अनुदानित करण्याचा निर्णय घेतला; वेदांत फाऊंडेशन व महाराष्ट्र शिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण संगणकाच्या माध्यमातून द्यावयाच्या
उपक्रमाची सुरुवात केली; शालेय शिक्षण विभागाची वेबसाईट सुरु केली. इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केली. मुंबईत अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरु केला. ऊर्दू शिक्षणासाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना केली. राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करण्यासंदर्भात तसेच
शाळांच्या गुणात्मक वाढीसाठी कोअर ग्रुप व सल्लागार समितीचे गठण. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजात सूत्रता आणून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम व महत्त्वपूर्ण निर्णय घेवून त्याची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्री म्हणून केला. 1995-1999, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; मे, 1998 ते फेब्रुवारी, 1999 कृषी व जलसंधारण खात्याचे मंत्री. फेब्रुवारी, 1999 ते ऑक्टोबर, 1999 कृषी, जलसंधारण, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री, डिसेंबर, 2008 ते ऑक्टोबर, 2009 पर्यंत शालेय शिक्षण, विधी व न्याय खात्याचे मंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री. नोव्हेंबर, 2009 ते नोव्हेंबर, 2010 परिवहन, बंदरे, विधी व न्याय खात्याचे मंत्री. नोव्हेंबर, 2010 ते सप्टेंबर, 2014 कृषी व पणन खात्याचे मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री; ऑक्टोबर, 2014 ते जून, 2019 विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा; 2019 पासून भारतीय जनता पक्षाचे कार्य, जून, 2019 ते नोव्हेंबर, 2019 गृहनिर्माण खात्याचे मंत्री; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.

 

Related posts

कर्नाटक निवडणुकीबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk

मोदी विरोधी एकजुटीचा ट्रेलर लॉन्च

News Desk

“शिंदे गटही टिकणार नाही, अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाजपमध्ये जाणार”, संजय राऊतांची भविष्यवाणी

Aprna