Site icon HW News Marathi

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा राजकीय परिचय

मुंबई |  शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचा आज मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. शिंदे गटातील 9 आणि भाजपचे 9 एकूण 18 आमदारांनी मंत्री आज (9 ऑगस्ट) शपथ घेतली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.  शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार सोहळा  मुंबईतील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये पार पडला. मंत्रिमंडळात स्थान मिळणाऱ्या दीपक केसरकर यांच्या अल्प परिचय करू घेऊ या.

दीपक केसरकर यांचा जन्म 18 जुलै1955 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये झाला आहे. दीपक केसरकर यांनी बी कॉमची पदवी घेतली असून त्यांनी डिप्लोमा इन एक्सपोर्ट मॅनेजमेंट पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. दीपक केसरकर यांच्या पत्नीचे नाव पल्लवी असून त्यांना एक मुलगी आहे. दीपक केसरकर हे व्यवसायाने बांधकाम व्यावसाजयक व शेतकरी आहेत. तर दीपक केसरकर हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 270- सावंतवाडी या मतदारसंघातील आमदार आहे.

दीपक केसरकर यांचा राजकीय परिचय

कार्यकारी सदस्य, जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली (भारत सरकार उपक्रम); उपाध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्था, सावंतवाडी; सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषद; अध्यक्ष, जिल्हा साक्षरता अभियान, सिंधुदुर्ग; गरीब, गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप, तसेच दरमहा शिष्यवृत्ती योजना सुरु केली; सुसज्ज ग्रंथालय व समाज मंदिरांची निर्मिती केली. सतत ५ वर्षे भव्य सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन; क्रीडा संकुलाची निर्मिती केली; महिलांसाठी बांबू प्रशिक्षण केंद्र, फळ प्रक्रिया केंद्र सुरु केले. बेरोजगारांसाठी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र सुरु केले; विविध कला व वस्तुसंग्रहालयाची निर्मिती केली; रक्तदान, योग शिबीर, आरोग्य तपासणी शिबिरांचे
आयोजन, गरीब जनतेला योग्य भावात स्वस्त धान्य वितरण कार्यक्रम राबविला. आयुर्वेदातील पंचकर्मावर आधारित रोजगार निर्मिती प्रकल्प तरुणांसाठी कार्यान्वित केला.

भजनी मंडळांना सर्वतोपरी सहकार्य, मच्छिमार, आपदग्रस्त, छोटे उद्योजक, झोपडपट्टीवासीय, छोटे व्यापारी, शेतकरी व पुरग्रस्तांना मदत; अध्यक्ष, बाळासाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था; उपाध्यक्ष, आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना. संचालक, सावंतवाडी अर्बन को-ऑप बँक; अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ; संचालक, इंडियन प्लायवूड रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (भारत सरकार) बेंगलोर, संचालक, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ; अध्यक्ष, रोटरी क्लब, सावंतवाडी, चेअरमन, रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट; संस्थापक सदस्य, नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाईंड (Nab); जिल्हा समादेशक, भारत स्काऊट आणि गाईड संस्था, सिंधुदुर्ग; काँग्रेस पक्षाचे 10 वर्षे तालुकाध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 वर्षे जिल्हाध्यक्ष4 वर्षे प्रदेश कार्यकारणी सदस्य. सप्टेंबर, 2014 पासून शिवसेनेचे कार्य, 15 वर्षे सदस्य आणि 8 वर्षे नगराध्यक्ष, नगरपरिषद, सावंतवाडी; शहरातील जनतेच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या; 5 वर्षे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद महासंघ, मुंबई. 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 5 डिसेंबर, 2014 ते 8 जुलै, 2016 वित्त व ग्रामविकास खात्याचे राज्य मंत्री. 8 जुलै, 2016 ते 9ऑक्टोबर, 2019 वित्त, नियोजन व गृह (ग्रामीण) खात्याचे राज्यमंत्री. ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, 2020 पासून समिती प्रमुख, विशेष हक्क समिती, विधानसभा. 9 ऑगस्ट मंत्रीपदाची शपथ.

Exit mobile version