HW News Marathi
राजकारण

जाणून घ्या… नवनीत राणा यांच्या अमित शहा भेटीमागचे कारण

नवी दिल्ली | अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या रजकीय वर्तुळता रंगली आहे. राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभूत केले होते. त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढविली होती आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना नवनीत राणा व रवी राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी ठरू शकेल. महाराष्ट्रात काँग्रेसचा एक, तर राष्ट्रवादीचे चार खासदार आहेत. राणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विरोधी पक्षाची ताकद कमी होईल. अमित शहा यांची भेट घेण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसून अमरावतीचा विकासच्या मुद्यावर आमच्यात चर्चा झाल्या असल्याची माहिती राणा यांनी माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडारा-गोदिंया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीवर

News Desk

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk

ममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत !

News Desk