HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : जाणून घ्या… मराठा समाजाला आरक्षणाद्वारे कोणते लाभ मिळणार

मुंबई | मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा एटीआर आज विधानसभा आणि विधानपरिषदेत सादर करण्यात आला आहे. मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर झाले आहे.

या आरक्षणामुळे मराठा समाजाला कोणकोणते लाभ मिळणार

  • मराठा समाजाला एक विशेष प्रवर्ग तयार करून आरक्षण
  • मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात १६ टक्के आरक्षण
  • मराठा समाजासाठी राज्यातील लोकसेवांमधील पदांवर आणि प्रवेश नियुक्त्यांमध्ये १६ टक्के राखीव जागा
  • अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वगळून अन्य अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये हे आरक्षण देण्यात आले आहे.

कृती अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे

  • मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षणाची तरतूद
  • राज्यात सद्यस्थितीत असलेल्या ५२ टक्के आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का न लावता केवळ उन्नत व प्रगत गटातील नसणाऱ्या व्यक्तींनाच ५० टक्क्यांची मर्यादा वाढवून आरक्षण टक्केवारीसाठी तरतूद
  • ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका या निवणुकींसाठी जागांच्या आरक्षणासाठी तरतूद नाही
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांची विखे-पाटील यांना अवमानता नोटीस

News Desk

“शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीत यावे लागले नाही,” संजय राऊतांचा टोला

Aprna

भाजपने ईडीची भीती दाखविल्यानेच शिवसेना युतीसाठी तयार !

News Desk