Site icon HW News Marathi

6 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून अजित पवारांच्या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी दिला गुरुमंत्री

मुंबई | “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे ६ जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मी पुण्याचा पालकमंत्री होतो, तर नाकीनऊ यायचे”, असा टोला विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना लगावला आहे. राज्य सरकारने काल (24 सप्टेंबर) पालकमंत्र्यांची घोषणा केली. यावरून अजित पवारांनी आज (25 सप्टेंबर) बारामतीमधील बारामती सहकारी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली.

अजित पवार म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. यात काही जिल्ह्यांमध्ये एकच पालमंत्री दिले आहेत. तर काही पालमंत्र्यांकडे दोन जिल्हे दिले असून माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्हे देण्यात आली आहेत. मी पुण्याचा पालकमंत्री होतो, तर माझ्या नाकीनऊ यायचे, आठवड्यातून किमान एक दिवस मला जिल्ह्यासाठी त्यावा लागत होता. यामुळे ज्यांच्याकडे सहा जिल्हे आहेत, ते कसे पेलवणार मला माहित नाही, परंतु, माझ्या त्यांना शुभेच्छा”, असे ते म्हणाले.

जिल्ह्यांच्या नियोजनासाठा फडणवीसांनी अजित पवारांना दिला गुरुमंत्र

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी त्यांना हा गुरुमंत्र देईन, येत्या काळामध्ये त्यांनाही दोन-तीन, कधी त्यांचे राज्य आले. आणि त्यांनाही दोन-तीन-चार जिल्हे ठेवण्याची वेळ आली. हे कसे मॅनेज करायचे, याचा गुरुमंत्री मी त्यांना देईल. मात्र, हे जे जिल्हे माझ्याकडे आहेत. ते नियोजन म्हणून हे जिल्हे माझ्याकडे आहेत. आणि मी तर अख्या महाराष्ट्र संभाळला आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांचे काय घेऊन बसलाय.

 

 

Exit mobile version