HW News Marathi
राजकारण

“गिरीश महाजन सभागृहात का नाही आले?”, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवारांचा संतप्त सवाल

मुंबई | “गिरीश महाजन सभागृहात का नाही आले?”, असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितवरून सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आजचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या अजित पवार (Ajit Pawar) हे मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत संतापलेले पाहायला मिळाले. विधानसभेत आज (30 डिसेंबर) आमदार वैभव नाईक यांनी पाच क्रमांकाची लक्षवेधी मांडली. परंतु, नाईकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा होणे अपेक्षित होते. नाईकांच्या लक्षवेधीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे उत्तर येणे अपेक्षित होते. पण, महाजन सभागृहात उपस्थित नसल्यामुळे तालिका अध्यक्षांनी पाचव्या क्रमांकाची लढवेधी पुढे ढकलली. यानंतर सहाव्या क्रमांकाची लक्षवेधी पुकारण्यात आली होती.

 

मंत्र्यांच्या विधीमंडळाच्या अनुपस्थितीमुळे अजित पवार संतप्त झाल्यावर सभागृहात म्हणाले, ” वैभव नाईक इथे बसले आहेत. किती दिवस ती पुढे ढकलताय?, आम्ही पण मंत्री होतो. आम्ही इथे एकदम बसलेलो नाहीय, मंत्र्यांचे काम आहे इथे येईचे. जर मंत्री नाही आला तर त्यांना जाब कोण विचारणार. एक वेळ आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे समजू शकतो. त्यांना जास्तची कामे असतात. दुसरे जण उत्तर देतात. आम्ही मान्य केले आहे. पण, गिरीश महाजन सभागृहात का नाही आले?, असा सवाल त्यांनी केला. पुढे अजित पवार म्हणाले, “आणि सरळ सांगतात, पुढच्या अधिवेशनात पुढच्या अधिवेशनात कोण राहतेय.  कोण राहते आणि कोण जाते हे माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली. तुम्ही पण बोलत नाही काही नाही. सगळ्यांचे लाड चाललेत लाड.”

 

अजित पवार भडकल्यानंतर तालिका अध्यक्ष म्हणाले, “आपण अध्यक्षांची चर्चा करून पाच क्रमांकाची लक्षवेधीनंतर घेण्याचा प्रयत्न करू. आपल्या पुढच्या सत्राच्या सिटींमध्ये आपण प्रयत्न करू यात. मी अध्यक्षांची चर्चा करतो”, असे म्हणत त्यांनी संतापलेल्या अजित पवारांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज भाजपचे उपोषण

News Desk

“मला पहिल्या पंगतीत बसवले असते तर…”, बच्चू कडू मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर म्हणाले…

Aprna

“दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SITमार्फत चौकशी होणार; उपमुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा

Aprna