Site icon HW News Marathi

“बारामतीला धडक मारुन काय होणार? “, अजित पवारांचा भाजपला सवाल

मुंबई | “बारामतीला धडक मारुन काय होणार?, ” असा सवाल उपस्थित करून भाजपला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी  टोला लगावला आहे. 2014 लोकासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बारामतीच मिशन सुरु केले आहे. आणि भाजपच्या बारामती मिशनवर बोलताना अजित पवारांनी टोला लगावला. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बारामती दौऱ्यावर आहेत.

यावेळी अजित पवार म्हणाले, “शेतकऱ्याला शून्य टक्के व्याजाने पैसे मिळत होते. परंतु, केंद्र सरकारने ते पैसे बंद केले असून याबद्दल केंद्र सरकारमधील कोणतेही नेतेमंत्री कुणीही यावर उत्तर देत नाही, यासारखे महत्वाचे प्रश्न सोडवले नाही. आणि बारामतीत गेलेत इथे जाऊन काय करणार आहात. उगीच बारामतीत धडका घेता येत. इथे उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते, इथे काही होणार नाही.”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बारामती दौऱ्यावर आले, असा प्रश्न अजित पवारांना पत्रकारांनी विचारले ते म्हणाले, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री बारामतीत येू द्यात. मग तुमच्या पोटात का दुखतेय?, आम्ही त्यांचे स्वागत करू. पण माझं असंच त्यांनी कुणाला तरी उभं केलं, त्याचं डिपॉझिटच जप्त झालं.. म्हणून तिथे धडका घेऊन काही फायदा होणार नाही,” असे ते म्हणाले.

 

Exit mobile version