Site icon HW News Marathi

“अशा सोम्या आणि गोम्याच्या प्रश्नाला महत्व देऊ नका”, पवारांच्या टीकेवर पडळकर म्हणाले…

मुंबई | “अशा सोम्या आणि गोम्याच्या प्रश्नाला महत्व देऊ नका”, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज (10 जानेवारी) आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी गोपीचंद पडळकराच्या (Gopichand Padalkar) टीकेला नाव न घेता टीका केली. यानंतर गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांच्या टीकेवर पलटवार केला आहे.
कृषी प्रदर्शनासाठी शरद पवारांनी पैसे घेतले, असा आरोप भाजप करत आहे, असा सवार पत्रकारांनी अजित पवारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “आपण एक शेतकरी उभा करा की, हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले. मी राजकारण सोडून देईन. आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्याची ताकद आहे का?, आव्हान स्वीकारून राजकारणातून निवृत्त व्हायचे. यामुळे एखादा उटसुट अशा पद्धतीने बालीश वक्तव्य करायला लागला. त्याला कुठला ही अर्थ नाही, अर्थ हिन वक्तव्य करायला लागला. तर तुम्ही आमचा वेळ कशाला घेता. आणि तुमचा ही प्रश्न विचार वेळ कशाला खर्च करता. अशा सोम्या, गोम्याच्या प्रश्नाला महत्व न देता. ज्यांची जन मानसात प्रतिमा आहे. ज्यांच्या प्रश्नाला खरोखरच आम्ही उत्तर देणे, हे जरुरीचे आहे. कारण तेही आमचे काम आहे. त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारा”, असा सल्ला अजित पवारांनी पत्रकारांना दिला आहे.
पवार कुटुंबियांना मी पुरुन उरलेलो – पडळकर
अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देत गोपीचंद पडळकर म्हणाले, “या पवार कुटुंबियांना मी पुरुन उरलेलो आहे. मी त्यांना सळो की पळो करून सोडलेले आहे. त्यामुळे अजित पवार निवृत्त आहेत. त्यांच्याकडे उत्तर राहिलेले नाही. त्यामुळे मी त्यांना बारामतीत जाऊन उत्तर देईन. आज आमची सत्ता असताना सुद्धा मी लोकांमध्ये जातोय. लोकांना जागृक करतोय. त्यांच्याबरोबर जे लोक गैरसमसामुळे होती. त्यांना बाजूला करतोय, त्यामुळे पवार कुटुंब बावचाळल्यासारखे करतय.”
उपटसुंभ लोकांच्या आरोपाला उत्तर देण्यास मी मोकळा नाही – अजित पवार
प्रत्येकाला उत्तर द्याला मी बांधित नाही. अशा उपटसुंभ लोकांच्या आरोपाला उत्तर देण्यास मी मोकळा नाही. पत्रकारांना रागाच्या रोषात म्हटले की, मी सांगितले ना. त्या व्यक्तीसंदर्भात मी उत्तर देण्यास बांधील नाही. त्यांनी कोणताही प्रश्न उपस्थित केला तर तो मोठा नेता लागत नाही. त्यांचे डिपॉझिट करून त्याला पाठविलेले आहे.
डिपॉझिट जप्त करून पाठवले
बारामतीचे चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात, अशा शब्दात गोपीचंद पडळकांना टीका केली होती. यासंदर्भात अजित पवारांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “मी उपटसुंभ लोकांच्या आरोपाला उत्तर द्यायला मोकळा नाही. किंवा उत्तर द्यायला बांधील नाही. त्यांचे डिपॉझिट जप्त करून पाठवले आहे”, अशा शब्दात अजित पवारांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाव न घेता पडळकर यांना टोला लगावला.
अजित पवार किस झाड की पत्ती – पडळकर
अजित पवारांच्या टीकेला गोपीचंद पडळकर म्हणाले, “बरोबरी ठरवण्याचा कोणाला अधिकार नाही. जनतेनी त्यांना जास्तची मते दिली. म्हणून त्या मस्ती आणि माजामध्ये त्यांनी जाऊने. या जनतेने अनेक लोकांना घरी बसविले आहे. इंदिरा गांधीसारख्यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे अजित पवार किस झाड की पत्ती आहे. त्यांना सुद्धा काही काळाने उत्तर मिळेल.
Exit mobile version