Site icon HW News Marathi

“अरे मी बाहेर वॉशरूमला गेलो…”, नाराजीच्या चर्चेवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन दिवसीय अधिवेशन काल दिल्लीत पार पडले. यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये येत होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (12 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देत नाराजी चर्चांवर पडदा पडला. “मीमध्ये थोडासा वॉशरुमला गेलो. तरी अजित पवार बाहेर गेले. तरी अजित पवार बाहेर, अरे मी बाहेर वॉशरूमला गेलो,” असे ते यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेते अजित पवारांनी राज्य सरकार आणि लम्पी आजारासंदर्भातील बरेचसे गैरसमज दूर करण्याी गरज असल्याचे म्हणाले.

अजित पवार म्हणाले, “यानंतर मी मराठी मीडियाशी चर्चा केली. त्यांना काय झाले ते सांगितले. पण कारण नसताना, मीमध्ये थोडासा वॉशरूमला गेलो. तरी अजित पवार बाहेर गेले. तरी अजित पवार बाहेर, अरे मी बाहेर वॉशरूमला गेलो…काय मला कळेत नाही. म्हणजे हा जो काही प्रकार चाचलेला आहे. जरु प्रत्येकाला आपली अपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तूस्थिती आधारीत बातम्या देण्याच्या करताची जबाबदारी आपल्या सर्व मान्यवरांची आहे. आपल्या सर्व चॅनेलवर आहे. त्यामुळे मी राज्यात गेल्यानंतर माध्यमांसमोर बोलेन मी कालही त्यांना सांगितले,” असा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला आहे.

तसेच अजित पवार पुढे म्हणाले, “तुम्हा सर्वांना माहिती आहे की 91 खासदार झालो. तेव्हापासून 31 वर्ष झाली. या 31 वर्षात मी राष्ट्रीय पातळीवर जातो, उपस्थित राहतो. मी तिथे काही मार्गदर्शन करत नाही. राज्यात कुठे सभा असेल, अधिवेशन असेल, राज्यात काही चर्चा सत्र असेल. मी यात भाग घेत असतो. मी माझी भूमिका त्याठिकाणी स्पष्टपणे त्यात मांडत असतो. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तुमचे गैरसमज दूर करुन राज्याचे सर्व प्रश्न आणि राज्य सरकारचे चुकीचे धोरणे मांडण्यासाठीची ही पत्रकार परिषद आहे.”

अधिवेशनात वेळे आभावी बोलले नाही

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन काल दिल्लीमध्ये पार पडले. एक विस्तारीत कार्यकारणी होती. ती परवा दिवशी होती, ती संध्याकाळी 5 वाजता सुरु झाली. रात्री 9 ते 10 पर्यंत चालले. यानंतर खुले अधिवेशन होते. हे अधिवेशन काल सकाळी 10 वाजता सुरु होणार होते. आणि दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार होते. त्या पद्धतीने ते झाले. अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी पक्षांची धोरणे आणि पुढच्या वाटचालीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यात महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते आणि प्रदेशाध्यक्ष बोलणे अपेक्षित असते. त्यामुळे तेथे बोलणे टाळले, परंतु, माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला. वास्थविक पणे इथे कोणी बोलू नका, असे कोणे बोलून दाखवू नका. मीच माझी भूमिका याठिकाणी घेतले. मी एकटाच बोललो असे नाही, तसेच बघितले तर सुनील तटकरे वेळे अभावी बोलू शकले नाही. त्याचबरोबर वंदना चव्हाण यांचे नाव होते. त्या पण वेळे अभावी बोलू शकल्या नाहीत. अजून काही दोन-तीन नावे हे वेगवेगळ्या राज्याचे प्रतिनिधी तेथे आले. तेही वेळे अभावी बोलू शकले नाही,” असे अजित पवार म्हणाले.

 

 

Exit mobile version