Site icon HW News Marathi

“वाचाळवीरांना आवरा…”, मंगलप्रभात लोढांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचा टोला

मुंबई | “वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे”, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्ष नेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभागत लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या वक्तव्यावर दिली आहे. लोढांनी शिंदेंच्या बंडाची तुलना ही शिवाजी महाराजांच्या आग्य्रातील सुटकेशी केली. यानंतर विरोधकांनी लोढांच्या वक्तव्यावर शिंदे सरकारवर टीका केली. नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केले होते. यानंतर राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. हे सर्व प्रकरण ताजे असतानाच लोढांनी केलेले वक्तव्य आता नवा वाद ओढावून घेतला आहे.
अजित पवार म्हणाले, “वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील या लोकांना कळत नाही. एखाद्याला ठेच लागली की दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करत असतो हे तर यांच्यात दिसतचं नाही. उलट चढाओढ लागलेली दिसते”, अशी टीका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. लोढांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमनास्पद वक्तव्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. एकाने चूक केली की मग दुसऱ्याला बोलायला संधी मिळाली की, तो चूक करतो, पुन्हा तिसरा चूक करतोय. हे कधी थांबणार आहे? असा संतप्त सवाल अजित पवारांनी केला.
एकनाथ शिंदे स्टेजवर असातानाच त्यांच्या देखतच तुलना केली. आपण कोणाशी तुलना करतोय, काय करतोय आपल्याला जबाबादरी काय, आपण कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा विचार करावा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊ शकते का? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? याचेही तारतम्य या लोकांना राहिले नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी  नाराजी व्यक्त केली. निवडणुका लागू दे…जनता यांना योग्य जागा दाखवेल, असेही ते म्हणाले.
मंगलप्रभात लोढा नेमके काय म्हणाले
राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासोबत केलेले बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाजेबच्या आग्रातील सुटकेशी केली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे आज (30 नोव्हेंबर) 363 वा शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान, लोढांनी शिंदेंच्या बंडाची तुलना ही शिवाजी महाराजांच्या आग्य्रातील सुटकेशी केली. मंगलप्रभात लोढा म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्य्रातील किल्ल्यात कैद करून ठेवले होते. परंतु, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी औरंगजेबाच्या हातात तुरी देऊन त्यांच्या आग्य्रातील किल्ल्यातून सुटून बाहेर आले. यामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंना देखील रोखण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, एकनाथ शिंदे त्यातून बाहेर पडले.”
संबंधित बातम्या

लोढांकडून शिंदेच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्य्रातील सुटकेशी; विरोधकांची टीका

Exit mobile version