HW News Marathi
राजकारण

शिवसेनेने उत्तर प्रदेशासाठी जाहीर केली ५ उमेदवारांची यादी

नवी दिल्ली | शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशच्या ५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशमधील कनौज मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याविरुद्ध शिवसेनेने आनंद विक्रम सिंह यांच्या मैदानात उतरविले आहे. शिवसेनेच्या या यादीत मेरठमधून आरती अग्रवाल, गाजियाबादमधून नागेंद्र चौधरी, फर्रूखाबादमधून पूनम यादव आणि बरेलीमधून तुलसी चौधरी यांचा समावेश आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये देखील एकूण ७ टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडतील.

आगामी लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा ११ एप्रिल, दुसऱ्या टप्पा १८ एप्रिल, तिसरा टप्पा २३ एप्रिल, चौथा टप्पा २९ एप्रिलला, पाचवा टप्पा ६ मे, सहावा टप्पा १२ मे आणि सातवा टप्पा १९ मे रोजी पार पडेल. लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजेंद्र दर्डा यांचा काँग्रेसच्या प्रसारमाध्यम-संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा

News Desk

बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप! – संजय राऊत

Aprna

‘आधे इधर आधे उधर, बाकी मेरे पीछे आओ’ अशी राज ठाकरेंची सध्याची अवस्था !

News Desk