HW News Marathi
राजकारण

Live Update : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल

नवी दिल्ली | मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. या पाचही राज्याची विधानसभा निवडणूक ही लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. यामुळे या राज्याच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रचार केला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन मोठ्या राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस या देशातील दोन मोठ्या आणि महत्वाच्या राजकीय पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. म्हणूनच या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या ठरतात. छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यांत अनुक्रमे १२ आणि २० नोव्हेंबर रोजी, मध्यप्रदेशमध्ये २८ नोव्हेंबर रोजी, राजस्थानमध्ये ७ डिसेंबर रोजी, मिझोरममध्ये २८ नोव्हेंबर तर तेलंगणामध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आज जाहीर होणाऱ्या या पाच राज्यांच्या निकालांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Live Update :

  • मिझोराममध्ये मिझोरम नॅशनल फ्रंट पक्षाला १४ जागा मिळाले आहे. इतर ९ जागा मिळाल्या आहेत. मिझोरम नॅशनल फ्रंट पक्षाच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  • राजस्थानमध्ये काँग्रेसने १०० जागांनी आघाडी घेतली आहे. भाजपमध्ये ७३ जागांनी पिछाडी, बहुजन समाजवादी पार्टी ५, सीपीएम २ आणि इतर १९ जागा मिळाल्या आहेत.

  • मध्य प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून काँग्रेसने आघाडी घेतली होती. परंतु दुपारीच्या वेळेत भाजपने १११ जागांनी आघाडी घेतली तर, काँग्रेसने १०८ जागांनी पिछाडीवर आणि इतर ११ जागा मिळाल्या आहेत.

  • राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलेट सत्ता स्थापनेसाठी ८ अपक्ष उमेदवारांशी हात मिळवणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • राजस्थानमध्ये काँग्रेसला ९९ जागांनी आघाडी, भाजप ७९ जागांनी पिछाडी, बहुजन समाजवादी पार्टी २, सीपीएम २ आणि इतर १६ जागा मिळाल्या आहेत.

  • तेलंगणात टीआरएसला ९० जागांनी आघाडी, काँग्रेसला १६ जागा, भाजप १, एआयएमआयएमला ५ अशा जागा मिळाल्या आहेत.

  • मिझोरामध्ये मिझोरम नॅशनल फ्रंट स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये फक्त ४ जागा, भाजपला १ जागा आणि इतर १ जागा मिळाली आहे.

  • छत्तीसगढमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला १६ जागांनी पिछाडीवर असून जनता काँग्रेस ४ जागा आणि इतर २ जागा मिळाल्या आहेत.

  • मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस ११६ जागांवर आघाडी मिळाली आहे तर भाजप ९४ जागांनी पिछाडी आणि इतर १० जागा मिळाल्या आहेत.

  • मिझोरमचे मुख्यमंत्री लल थनहवला यांचा चंफाई दक्षिण जागेवरून पराभव झाला आहे. त्यांचा हा पराभव मिझोरम नॅशनल फ्रंटचे टीजे ललनुंत्लुअंगा विजयी झाले आहेत.

  • राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून खूप छान काम केले आहे. त्यांच्या कामाचे हे फळ असल्याचे सचिन पायलट यांनी म्हटले आहे.

  • सध्याची स्थिती पाहाता राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकार होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. २०१३मध्ये काँग्रेसला राजस्थानमध्ये २१ जागा मिळाल्या होत्या. परंतु आपण सर्वांनी शेवटच्या निकालाची वाट पाहवी, असे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलेट यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली

  • मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला ११२ जागांनी आघाडी तर भाजप १०२ जागांनी पिछाडीवर असून इतरला १४ जागा मिळाल्या आहेत.

  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सबको साथ लेकर चल थे है, असे काँग्रेसच्या पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे.

  • मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल असा माझा विश्वास असल्याचे मध्य प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नेता कमलनाथ यांनी म्हटले आहे.

  • तेलंगणामध्ये टीआरएस पक्षाने आघाडी मिळाल्यामुळे पक्षाच्या कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांनी नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला आहे.

  • राजस्थानमध्ये काँग्रेस ९१ जागांनी आघाडी घेतली असून भाजप ७१ जागांवर पिछाडी तर इतर २२ जागा मिळाल्या आहेत.

  • मिझोरामध्ये मिझोराम नेशनल फ्रंट पक्षाने आघाडी घेतली आहेत. त्यामुळे मिझोराम नेशनल फ्रंट पक्षाच्या कार्यकार्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे.

  • छत्तीसगढमध्ये काँग्रेस २१ जागांनी आघाडी घेतली आहे तर भाजप ५ जागांनी पिछाडी आणि जनता काँग्रेस २ जागा मिळाल्या आहेत.

  • राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे झालरा पाटण मतदार संघातून ८८४५ मतांनी आघाडी घेतली अाहे. तर काँग्रेसचे नेता अशोक गेहलोद सरदारपुरा मतदार संघातून ५११२ मतांनी आघाडी घेतले आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे सचिन पायलेट हे टोंक ५२९५ मतांनी आघाडी घेतली आहे.

  • छत्तीसगढमध्ये काँग्रेस १३ जागांनी आघाडी मिळाली असून भाजप ४ जागा आणि जनता काँग्रेसला १ जागा मिळाली आहे.

  • राजस्थानमध्ये काँग्रेस ८२ जागांनी आघाडी घेतली असून भाजप ६२ पिछाडी आणि इतर २१ जागा मिळाल्या आहेत.

  • काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष साजरा केला

  • एआयएमआयएमचे नेते चंद्रायन गुट्टा मतदार संघातून अकबरुद्दीन ओवेसी विजयी आहेत.

  • राजस्थानमध्ये काँग्रेस ६३ जागांनी आघाडी घेतली तर भाजपने ४५ जागांनी पिछाडी आणि इतर १५ जागा मिळाल्या आहेत.

  • मिझोराममध्ये मिझोराम नेशनल फ्रंट २ जागा तर भाजपला १ जागा मिळाली आहे.

 

  • राजस्थानमध्ये काँग्रेसचे अशोक गेहलोद ५११२ मतांनी आघाडीवर आहेत तर भाजपच्या वसुंधरा राजे ४०५५ मतांनी पिछाडीवर घेतली.

  • राजस्थानमध्ये काँग्रेस ४७ जागांनी आघाडी तर भाजपची ३४ जागांनी पिछाडीवर आणि इतर ३ जागा मिळाल्या आहेत.

  • मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस ११० जागांनी पुढे तर भाजप १०२
  • पाच राज्याच्या निवडणुकीचा निकालांचा परिणाम शेअर बाजारवर पडलेला दिसत आहे.

  • तेलंगणामध्ये टीआरएस १२ जागांनी आघाडी असून एआयएमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांच्या पक्षाला १ जागा मिळाली आहे.
  • राजस्थानच्या राजनांदगावमधून काँग्रेसेचा रमन सिंग मागे तर काँग्रेसचे करुण शुकल्ला पुढे आहेत.

 

  • राजस्थानममध्ये काँग्रेस १५ जागांनी आघाडी घेतली असून भाजपने फक्त १३ जागांनी मागे आहेत.
  • छत्तीसगढमध्ये राजनांदगाव रमण सिंह पिछाडीवर, काँग्रेस उमेदवार करुणा शुक्ला आघाडी घेतली आहे
  • ९.१६ : तेलंगणामध्ये टीआरएस ४० आघाडी घेतली असून काँग्रेस पुढे, भाजप ३५, अन्य ०६
  • ९.१५: छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस भाजपपेक्षा पुढे, काँग्रेस २३ जागांवर पुढे, तर भाजपाला १५ जागांवर आघाडी
  • ९.११: राजस्थानमध्ये सचिन पायलटच्या निवसस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
  • ९. ००: राजस्थानमध्ये काँग्रेसने ६६ जागांवर आघाडी घेतील असून भाजप ५० जागाने मागे राहिले आहेत. बीएसपी १ जागा मिळाली आहे.
  • ८.५६ : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुधरा राजे झालरापाटनमधूल पुढे आहेत
  • ८.५४ : मध्य प्रदेशच्या बुधवी मतदार संघातून मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान पुढे आहेत
  • ८. ५१ : तेलंगणामध्ये टीआरएस ३५ जागांनी पुढे तर काँग्रेस १८ आणि भाजप ३ जागा मिळाल्या आहेत.
  • ८.५० : राजस्थानमध्ये काँग्रेसची आघाडी घेत काँग्रेस २७ जागांनी पुढे तर भाजप १२ जागांनी मागे
  • ८.४५ : मध्य प्रदेशमधून शिवपुरी मतदार संघातून यशोधरा राजे राजे पुढे आहेत.
  • ८.३५: राजस्थानमध्ये काँग्रेस १९ जागांनी पुढे आहेत तर भाजप ९ जागांनी मागे
  • ८.३३: तेलंगणामध्ये टीआरएसला ४ जागा तर काँग्रेसला २ जागाने मागे
  • ८.२९: मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतमोजणीत काँग्रेस ६ जागांनी आगेकूच केली तर भाजपला ४ जागा मिळाल्या आहेत
  • काँग्रेस कार्यकर्त्यांनीन पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बाहेर हवन करत आहेत.

  • ८.२१ : मिझोरामध्ये काँग्रेसला १ आणि मिझोराम नेशनल फ्रंटला देखील १ बरोबरी केली आहे.
  • ८.१९ : छत्तीसगढमध्ये भाजप ४ , काँग्रेस ४ बरोबरी केली आहे.
  • ८. १८: मध्य प्रदेशात भाजप ४ तर काँग्रेस ३ मागे
  • राजस्थान – भाजप – २, काँग्रेस – २
  • छत्तसीगढ – भाजप -२ , काँग्रेस – ४
  • तेलंगणा – टीआरएस – २ , काँग्रेस – १, इतर – १
  • मध्य प्रदेशममध्ये भाजप ३, काँग्रेस – १

  • भोपाळमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरच्या सुक्षेत वाढ केली आहे.
  • भोपाळमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे
  • पाजही राज्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे
  • मध्य प्रदेश, छत्तीसगढ,राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाचही राज्यांच्या विधानसभा मतमोजणीला सकाळी ८वाजता सुरुवात होणार आहे.
  • मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा मतमोजणी केंद्र बाहेर कडेकोड पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पद्मावत सिनेमा पाहण्यासाठी वेळ आणि पैसा वाया घालवू नका – ओवीसी

swarit

आज काँग्रेसने मला माझी जागा दाखवून दिली !

News Desk

जानकर देणार पवारांना आव्हान, भाजपकडे करणार ६ जागांची मागणी

News Desk