HW News Marathi
राजकारण

Lok Sabha Election 2019 : ‘पहले मतदान फिर जलपान’, पंतप्रधान मोदींचे ट्वीट करत नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली | १७ व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशातील २० राज्यात ९१ मतदारसंघात आज (११ एप्रिल) मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. खासकरुन तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडा. ‘पहले मतदान फिर जलपान’ अशी विनंती मोदींनी ट्वीट करत केली आहे.

‘लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात नक्की सहभागी व्हा अशी माझी सर्वांना विनंती आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान करा. खासकरुन तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडा. पहले मतदान फिर जलपान’ असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भातील ६ जिल्ह्यातील ७ मतदारसंघामध्ये मतदान सुरू झाले आहे. यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम अशा एकूण सात मतदारसंघांत मतदानाला सुरुवात झाली आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारल्याच्या मुद्यावरून अजित पवार सभागृहात आक्रमक

Aprna

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी | नरेंद्र मोदी

News Desk

राममंदिर प्रकरणी शशी थरूर यांचे वादग्रस्त वक्तव्य

Gauri Tilekar