HW Marathi
महाराष्ट्र राजकारण लोकसभा निवडणुक 2019

गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेतही निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात

मुंबई | चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या गिरगावात, नाशिक, ठाणे डोंबिवली आणि अन्य ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात आल्या होत्या. चित्ररथ, मर्दानी खेळ, बाईक रॅली ढोल-ताशा आणि लेझीमच्या तालावर तरुणाई नव वर्षाचे स्वागत करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचे देखील प्रचार ऐन रंगात आले आहेत. या स्वागत यात्रेत सहभागी होऊन अनेक उमेवारांनी आपला प्रचार केला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर आपल्या कुटुंबियांसोबत गुढी उभारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या घरी गुढी उभारुन राज्यातील जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा देण्यात दिल्या. काही दिग्गज नेत्यांनी त्यांच्या घरी लोक गुढी उभारुन नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी चोरकोपमधील स्वागत यात्रेत सहभागी होऊन ढोलो वाजून लोकांचे लक्ष वेधले. तर दुसऱ्या बाजूला मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांनी देखील स्वागत यात्रेत सहभागी होऊन लोकांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बहुचर्चित अशा ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मनोज कोटकसह विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांनी देखील स्वागत यात्रेत सहभागी होऊन प्रचार केला आहे.

Related posts

राफेलवरून संसदेत गदारोळ, राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार

News Desk

ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा होणार !

News Desk

एखाद्याने पंतप्रधान मोदींवरील प्रेमापोटी अशा प्रकारे प्रचार केला असेल !

News Desk