HW News Marathi
राजकारण

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान

मुंबई | देशभरात आज (२३ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह १४ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचबरोबर गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान पार पडणार असून २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE

  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले मतदान

  • भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पत्नी सुलक्षणा सावंत यांनी केले मतदान

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले मतदान

  • सातारा लोकसभा मतदारसंघ ११ वाजेपर्यंत १७.५० टक्के
  • पाटीसार समाजाचे नेत हार्दिक पटेल यांनी सुरेंद्रनगर येथील मतदान केंद्र मतदानाचा हक्क बजावला

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी बजवला मतदानाचा हक्क

  • शिवसेनेचे साताऱ्याचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचीमतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली

  • मतदान केल्यानंतर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

  • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • देशात कोणत्याही एका पक्षाची सत्ता येणार नाही !

  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, निर्मलताई दानवे, रेणूताई संतोष दानवे यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • जळगावमध्ये ७.२१ % तर रावेरमध्ये ८.४८ % मतदानाची नोंद
  • पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

    • मतदान केंद्र परिसरात काँग्रेस बूथ बंद पाडून पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजप अरेरावी करत असल्याचा आरोप पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार.
    • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • देशभरात सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी, महाराष्ट्रात ०.९९% मतदानाची नोंद

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गांधीनगर मतदारसंघाचे उमेदवार अमित शाह यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि पत्नी अंजली यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

  • राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार संजय शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • कोल्हापूरमध्ये ७ ठिकाणी ईव्हीएम मशिन्स बंद, मतदारांचा खोळंबा
  • औरंगाबादमध्ये ईव्हीएम बंद, मतदात्यांचा विरस
  • माढ्यामध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ते’ साध्वी प्रज्ञाचे वैयक्तिक मत, पक्षाचा काहीही संबंध नाही !

News Desk

जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश केलात तर तुम्हाला पाठिंबा देऊ !

News Desk

विरोधकांच्या ईव्हीएम संशय प्रकरणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk